Supriya Sule : नवाबभाई सत्य सांगत होते, ड्रग्ज प्रकरण फर्जीवाडा आहे...

संभाजीराजे छत्रपती यांनी घोडेबाजर होऊ नये म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. (Ncp)
Mp Supriya Sule-Nawab Malik
Mp Supriya Sule-Nawab MalikSarkarnama

परभणी : एनसीबीकडून क्रुज ड्रग्ज प्रकरणात करण्यात आलेली कारवाईबाबत राष्ट्रवादीचे नेते तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलीक यांनी हा सगळा `फर्जीवाडा`, आहे असा आरोप केला होता. (Parbhani) आज या प्रकरणात आर्यनखानला क्लीनचीट मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नवाब मलीक हे सत्यच बोलत होते, हा सगळा प्रकार फर्जीवाडा आहे, हे ते सांगत होते आणि आता ते सिद्ध देखील झाले आहे.

पण आमच्या नवाबभाईला (Nawab Malik) सत्य बोलण्याची काय शिक्षा मिळाली हे देखील आपल्यासमोर आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी क्रुज ड्रग्ज प्रकरणावरील कारवाईवर आपले मत व्यक्त केले. परभणी येथे सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दिव्यांग मुलांना श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) परभणीत आल्या होत्या.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी ड्रग्ज प्रकरणासह भोंगे उतरवण्यासाठी मनसेने केलेले आंदोलन, राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजर होऊ नये अशी संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेली भूमिका यासह विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

सुरूवातीलाच एनसीबीकडून क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा सगळा प्रकार बनाव आहे, त्याला आमच्या नवाबभाईनी फर्जीवाडा म्हणून त्यातील सत्य सगळ्यांसमोर आणले होते. प्रसार माध्यमांनी देखील तेव्हा मलिकांना खूप साथ दिली. आज ते प्रकरण फर्जीवाडा होते हे सिद्ध झाले आहे.

नवाब मलिक हे सातत्याने सत्य सांगत होते. पण सत्य बोलणाऱ्या नवाबभाईंवर आज काय वेळ आली आहे हे आपण सगळे पाहत आहोत ? संभाजीराजे छत्रपती यांनी घोडेबाजर होऊ नये म्हणून राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. शेवटी एवढ्या मोठ्या घरातील व्यक्तीकडून असा निर्णय होणे हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारेच ठरणार आहे, आम्ही त्यांच्या निर्णयाचा सन्मानच करतो.

Mp Supriya Sule-Nawab Malik
Nitin Gadkari : अमृत सरोवर योजनेतून देशभरात ७५ हजार तलाव, शेततळी, नाला खोलीकरण करणार..

ओबीसी राजकीय आरक्षणा संदर्भात मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये जी तुलना केली जात आहे, ती योग्य नाही. मध्यप्रदेश सरकार संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो नीट समजून घेतला पाहिजे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षणा संदर्भात आपण एकत्रिपणे पुढे जाऊ असे फोन करून सांगतिले होते.

परंतु दोन दिवसांत असे काय घडले ? की दिल्लीत बैठक झाली आणि पुढे असा निकाल आला? याचा पुनरुच्चार देखील सुप्रिया सुळे यांनी केला. या संदर्भात जेव्हा आपण प्रश्न उपस्थितीत केला तर आम्हाला शिव्याशाप दिल्या गेल्या. आपण शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, आणि शिव्याशाप देतो हे योग्य आहे का ? पण आम्ही अंधश्रद्धा मानणारे लोक नाहीत, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, असा टोला देखील सुळे यांनी भाजपला लगावला.

भोंग्यासाठी केलेल्या आंदोलनाचा हेतू चांगला असेल, पण प्रत्यक्षात काय घडले? पंढरपूर, आमच्या बारामतीतील मंदिरांवरचे लाऊडस्पीकर उतरवले गेले, अशा शब्दात सुळे यांनी मनसेच्या भोंगे आंदोलनाला टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com