समृद्धी महामार्गाचा असाही वापर ; व्यापाऱ्याने वाळत घातली मका

(Nagpur-Mumbai Samrudhi Mahamarg) विशेष म्हणजे या रस्त्यावर संबंधित व्यापाऱ्याने कुणाच्या परवानगीने मका वाळत घातली? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
Samrudhi Mahamarg
Samrudhi Mahamarg Sarkarnama

जालना ः राज्यातील फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आज एक अजबच प्रकार घडला. नागपूर ते मुंबई हे अंतर अवघ्या सात तासांत पार करण्याचा दावा आणि विमाने देखील उतरू शकतील अशी व्यवस्था असलेल्या या महामार्गावर चक्क एका व्यापाऱ्याने मका वाळत घातल्याचा प्रकार समोर आला आहे. जालना तालुक्यातील जामवाडी परिसरात हा प्रकार घडला.

कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या या प्रक्लपाचा असाही वापर होत असल्याचे याची चर्चा रंगली आहे. समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पुर्णत्वाकडे जात आहे. आधीच्या फडणवीस आणि आता ठाकरे सरकारे देखील या प्रकल्पाला गती देण्याचे काम केले आहे.

राज्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू शकणाऱ्या समृद्धी महामार्गासाठी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमीनी दिल्या. अजून हा महामार्ग वाहतुकीसाठी सुरू झालेला नसल्याने याचा वापर अनेक कामांसाठी केला जात आहे. एका व्यापाऱ्याने तर चक्क या रस्त्यावर मका वाळवत घातल्याचे दिसून आले.

जामवाडी ( ता.जालना) परिसरात समृध्दी महामार्गाचे काम सुरु आहे. जामवाडी ते नवीन मोंढ्यात येणारा हा रस्ता आहे. या परिसरात महामार्गाचे काम चालू असून परिसरात वळण रस्त्यावर अनेक सिमेंट कठडे लावण्यात आलेले आहेत. आश्चर्य म्हणजे महामार्गाचे काम चालू असतांना देखील येथून ट्रकसह इतर जड वाहने येथून ये-जा करतात.

Samrudhi Mahamarg
सत्तेत असलेल्या पक्षाने पीक विमा कंपन्यांची कार्यालये फोडली, म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान

बुधवारी ( ता.२० ) महामार्गावर मोंढ्यातील एका व्यापाऱ्याने चक्क मकाचे पोते आणून वाळत घातले. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु यामुळे अपघात घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर संबंधित व्यापाऱ्याने कुणाच्या परवानगीने मका वाळत घातली? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com