जालन्यातून अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची 5 तासानंतर सुटका; अपहरणकर्त्यांनी मागितले होते 4 कोटी

पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
Crime News Jalna
Crime News Jalna Sarkarnama

जालना : जालना (Jalna) शहरात एका मेडिक व्यावसायिकाच्या दहावीत शिक्षण घेणाऱ्या मुलाचे अपहरण (Kidnap) करून तब्बल 4 कोटीची खंडणी मगितल्याची घटना शहरात घडली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने जिल्ह्यात नाकाबंदी करत 5 तासात मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे

Crime News Jalna
जालना हादरले : चार कोटींच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण

जालना शहरातील मेडीकल व्यावसायिक महावीर गादिया यांचा 16 वर्षाचा मुलगा स्वयम् हा 10 वी ची परीक्षा देण्यासाठी पोद्दार शाळेच्या परीक्षा केंद्रावर गेला होता. मात्र, साडेबारा वाजता परीक्षा संपूनही तो परत आला नाही, म्हणून पालकांनी ड्राइव्हरच्या मोबाईलवर फोन केला असता अज्ञात अपहरण कर्त्यांनी त्यांना मुलगा हवा असल्यास चार कोटीं रुपये आणून देण्याची मागणी केली. त्यांना अंबड चौफुली, त्यानंतर अंबड शहरात बोलावून अपहरणकर्ते फरार झाले होते.

Crime News Jalna
जामिनावर बाहेर आलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा चार जणांनी केला खुन...

मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात मुख्य रस्त्यासह जिल्हाभरात नाकाबंदी करून चालकाचा मोबाईल ट्रेस केला. मात्र, मोबाईल लोकशेन सतत बदलत होते. यामुळे सर्व तालुक्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली. यानंतर मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना मुलगा आणि चालक अंबड रोडवरील शहापूर जवळ आढळून आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जालना पोलिस करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com