चौदा वर्षाच्या मुलीचा ४८ वर्षाच्या इसमाशी होणारा बालविवाह रोखला

नियोजित बालविवाहातील व्यक्ती हा त्या मुलीचा भाऊजी असल्याची माहिती सांगण्यात येते. (Osmanabad District)
Child Marriage
Child MarriageSarkarnama

उमरगा : समाजामध्ये असलेले अज्ञान, कायद्याची अपुरी माहिती यामुळे जीवनाचा साथीदार निवडण्याचे स्वातंत्रही मुलींना मिळत नसल्याचा प्रकार आणि बालविवाह कायदा सर्रास मोडीत काढला जात असल्याच्या (Child Marraige) अनेक घटना उघडकीस येत आहेत. (Osmanabad) रविवारी (ता.पाच) उमरगा शहरात एका चौदा वर्षीय मुलीसोबत ४८ वर्षीय व्यक्तीचा होणारा बालविवाह प्रशासकी यंत्रणेच्या संतर्कतेमुळे रोखण्यात आला. (Marathwada)

बालविवाह प्रतिबंध समिती, पोलिस व महसुल प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत एका कोवळ्या मुलीचे आयुष्य उद्धवस्त होण्यापासून रोखले. उमरगा शहरातील मुळज रोडजवळील उर्दू शाळेच्या परिसरातील ही घटना आहे. रविवारी सकाळी दहा वाजता समितीचे सदस्य सचिन बिद्री यांना बालविवाह होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

मिळालेल्या अल्पश: माहितीच्या आधारे त्यांनी तहसीलदार राहुल पाटील, पोलिस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि यंत्रणा सज्ज झाली. ब्रिदी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, मंडळ अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी एस. ए. माचन्ना, बिट अंमलदार बालाजी कामतकर, पोलीस नाईक लक्ष्मन शिंदे यांनी नियोजन करून मुळजरोड भागात शोधाशोध सुरु केली.

एका घरासमोर दोन शेळ्या कापण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे दिसून आले. त्याची विचारणा केली असता, त्या मुलीच्या आईने मान्य केले की, आज विवाह जुळविण्याचा (कुंकू लावण्याचा) कार्यक्रम आहे. तेथे समोर दिसणारे चित्र अंगावर शहारे आणणारे होते. एका चौदा वर्षाच्या मुलीच्या कपाळी कुंकू अन् हातात बांगड्या होत्या.

Child Marriage
प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीला सख्ख्या भावानेच संपवले

या कुटुंबांना संबंधितांनी बालविवाह कायद्याची माहीती देत, त्याचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या परिणांमांची जाणीव करून दिली. दोन्ही कुटुंबाची समजूत घातल्यानंतर मुलीचे वय लग्ना योग्य म्हणजेच अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला शोभेल, तिच्या पंसतीनूसार योग्य मुलासोबत विवाह करण्याचे मान्य करण्यात आले.

मुलीचे आयुष्य उद्धवस्त करू नका, अशी कानउघडणी संबंधित अधिकाऱ्यांनी या कुटुंबाची केली, तेव्हा कुठे हा बालविवाह टळला. नियोजित बालविवाहातील व्यक्ती हा त्या मुलीचा भाऊजी असल्याची माहिती सांगण्यात येते. त्याचा हा 'तिसरा' विवाह होणार होता. या पूर्वीच्या दोन्ही पत्नी मयत आहेत. त्यातील एकीची बहिणच बालविवाहाची बळी जाणार होती.

यात पोलिसांनी मुलीला आईच्या स्वाधीन करत ताकीद दिली, तसेच तिसऱ्यांदा बोहल्यावर चढू पाहणाऱ्या इसमालाही खडसावले. मुलीच्या आईकडून आणि त्या व्यक्तिकडून लेखी हमिपत्र घेत उपस्थित पाहुणे मंडळींच्या स्वाक्षरीने पंचनामा करून नियोजित बालविवाह रोखला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com