`आमच्या बहिणींवरील छापे थांबवा; अन्यथा तरूणांच्या संयमाचा बांध फुटेल!`

संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) अजितदादांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले..
`आमच्या बहिणींवरील छापे थांबवा; अन्यथा तरूणांच्या संयमाचा बांध फुटेल!`
Ncp Mla Kshirsagar BeedSarkarnama

बीड : केंद्रीय आयकर विभागाकडून जाणिवपूर्वक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर कारवाया केल्या जात असल्याचा आरोप करत बीडमध्ये अजित पवार यांच्या समर्थनार्थ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्रीय आयकर विभागाचा धिक्कार असो, या केंद्रातील भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडक वर पाय अशा घोषणांनी बीड दणाणून गेले होते.

इतिहास साक्षीदार आहे, महाराष्ट्र कधी झुकत नसतो, दिल्ली असो या कुणीही यापुढे वाकत नसतो ,असा इशारा देत आम्ही पवार कुटुंबियांवर जिवावर उदार होवून प्रेम करतो. त्यामुळे आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी यावेळी दिला.

जेवढा दाबण्याचा प्रयत्न कराल, त्याच्या दुप्पट ताकदीने पलटवार करू, आता धाडी थांबवा नाहीतर आम्हा महाराष्ट्रातील सर्व तरूणाच्या संयमाचा बांध फुटेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मंगळवारी (ता. १२) रोजी केंद्रीय आयकर विभागाच्या विरोधात व अजित पवार यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संदिप क्षीरसागर म्हणाले, सुडबुद्धीने छापेमारी करणार्‍या केंद्रीय आयकर विभागाच्या निषेधार्थ ही निदर्शने करत आहोत.

अजित पवारांवर अनेकदा आरोप, टीका झाली पण आम्ही संयमाने प्रतिउत्तर दिले. पण तुम्ही जर विनाकारण आमच्या आई, बहिणींच्या घरी धाडी टाकून प्रसिद्धीचा आव आणत असाल, तर जास्त काळ सहन करणार नाही.

Ncp Mla Kshirsagar Beed
आता पुन्हा फसवणूक करून घेणार नाही; भाजप सगळ्या निवडणूका स्वबळावरच लढणार!

Related Stories

No stories found.