Sambhjai Patil Nilangekar News : महात्‍मा बसवेश्‍वरांचा पुतळा एक इंचही हलवू देणार नाही; मी जनभावने सोबत..

Marathwada : या ठिकाणी उड्डाणपुल करण्‍याचा पर्यायही सुचविण्‍यात येणार असल्याचे निलंगेकर म्हणाले
Sambhjai Patil Nilangekar News, Latur
Sambhjai Patil Nilangekar News, LaturSarkarnama

Latur : शहरातील कव्‍हा नाका येथील महात्‍मा बसवेश्‍वर यांचा अश्‍वारूढ पुतळा प्रत्‍येक लातूरकरांची अस्मिता आहे. (National Highway)राष्‍ट्रीय महामार्गांवर असलेला हा पुतळा स्‍थलांतरीत करण्‍यात येणार असे प्रशासनाकडून सांगण्‍यात येत आहे. मात्र हा पुतळा स्‍थलांतरीत होवू नये, अशी जनभावना आहे. या प्रकरणी आम्‍ही जनभावने सोबतच असून जनभावनेचा आदर करत हा पुतळा स्‍थलांतरीत होवू देणार नाही. यासाठी आपण वचनबध्‍द असल्‍याचे, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्‍पष्‍ट केले.

Sambhjai Patil Nilangekar News, Latur
BRS Rally News : तेलंगणा माॅडेलचा प्रचार सुरू, जागोजागी पोस्टर आणि मतदारसंघात वाहने..

महात्‍मा बसवेश्‍वर यांचा पुतळा स्‍थलांतरीत होवू नये यासाठी डॉ.अरविंद भातांब्रे यांनी आमरण उपोषण सुरू केलेल आहे. (Sambhaji Patil Nilangekar) निलंगेकर यांनी आज उपोषण स्‍थळी भेट देवून डॉ.भातांब्रे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकरांशी बोलतांना निलंगेकर यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. (Latur) रत्‍नागिरी-नागपूर हा राष्‍ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जात आहे. या राष्‍ट्रीय महामार्गावर असलेला महात्‍मा बसवेश्‍वर यांचा पुतळा स्‍थलांतरीत करण्‍यासाठी प्रशासनाकडून पत्रव्‍यवहार करण्‍यात येत आहे.

मात्र सदर पुतळा स्‍थलांतरीत होणार नाही किंवा तो एक इंचही हालणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच मांडली आहे. (Marathwada) पुतळा स्‍थलांतरीत होवू नये अशी प्रत्‍येक लातूरकरांची जनभावना आहे. महात्‍मा बसवेश्‍वर यांचा पुतळा प्रत्‍येक लातूरकरांची अस्मिता असून ती जपण्‍याचे काम लोकप्रतिनिधी या नात्‍याने आपण पार पाडणार आहोत. पुतळा स्‍थलांतरीत होवू नये याकरीता यापूर्वीच केंद्रीय रस्‍ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी पत्रव्‍यवहार करण्‍यात आलेला आहे.

पुतळा आहे त्‍या जागेवर राहावा याकरीता विविध पर्याय समोर येत असून यापैकी योग्‍य तो पर्याय नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून अंतिम करण्‍यात येईल. याठिकाणी उड्डाणपुल करण्‍याचा पर्यायही सुचविण्‍यात येणार असल्याचे निलंगेकर म्हणाले. गडकरी यांनी देखील स्‍थानिक जनभावना लक्षात घेवूनच निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासित केलेले आहे. लवकरच याबाबत चर्चा करण्‍यासाठी शिष्‍टमंडळासोबत आपण स्‍वत: गडकरी यांच्या भेटीला जाणार आहोत, असेही निलंगेकरांनी सांगितले.

दरम्यान, डॉ.अरविंद भातांब्रे यांना उपोषण मागे घेण्‍याची विनंतीही त्यांनी केली. पुतळा स्‍थलांतर प्रकरणाचे काहीजण प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरून राजकारण करत असल्‍याचा आरोपही निलंगेकर यांनी यावेळी केला. या राजकारणाच्‍या माध्‍यमातून स्‍वत:चा स्‍वार्थ साधण्‍याचा हेतू यामागे आहे. ज्‍या प्रशासकीय अधिका-यांकडून हे सर्व होत आहे, त्‍याची दखल घेण्‍यात येत असून याबाबत शासनस्‍तरावरही सांगण्‍यात आले आहे. त्‍या प्रशासकीय अधिका-यांवर कार्यवाहीची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com