Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत भाजपच्या मंत्र्याचे सकारात्मक संकेत

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama

नांदेड : जुनी पेन्शन योजना काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सरकारच्या काळातच बंद करण्यात आली, त्यांनीच हे पाप केले आहे. शिंदे (Eknath Shinde)-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ती लवकर कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी ग्वाही भाजपचे (BJP) नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नांदेडमध्ये बोलताना दिली. (State government positive about old pension scheme: Girish Mahajan)

भाजपचे औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री गिरीश महाजन हे शुक्रवारी (ता. २७ जानेवारी) नांदेड येथे आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधत जुन्या पेन्शनबाबत आशादायी सूर लावला.

Girish Mahajan
Ajit Pawar : भाजपला उमेदवारही मिळत नाहीत; म्हणूनच आमचे लोक फोडले जात आहेत : अजित पवारांचा आरोप

नांदेडचे पालकमंत्री महाजन म्हणाले की, जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे सचिव यासंदर्भात योग्य विचार करतील. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जुन्या पेन्शन योजनेबबात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सुटेल, असा आशावादही महाजन यांनी व्यक्त केला.

Girish Mahajan
Politics : सुमित्रा महाजन यांनी मानले गडकरींचे आभार; म्हणाल्या, अर्ध्या तासात डोंबिवलीत पोहोचले

राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे -फडणवीस सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रलंबित समस्या मार्गी लागतील, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांबाबत यापूर्वी मांडलेले मत वैयक्तिक आहे. त्यांच्या या मताविरुद्ध शिक्षकांनी नाराजी व्यक्त करत मोर्चे, आंदोलन केले. त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असेही महाजन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com