Abdul Sattar : दोन बायका केलेल्यांना बुटाने मारले पाहिजे; अब्दुल सत्तारांचा रोख कुणाकडे?

Abdul Sattar News : अब्दुल सत्तारांनी टीका करताना केलेल्या विधानावरून ते पुन्हा चर्चेत
Abdul sattar News
Abdul sattar News Sarkarnama

'दोन बायका केलेल्यांना बुटाने मारले पाहिजे', अशी टीका राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलीय. मात्र, ही टीका करताना त्यांचा रोख नेमकी कुणाकडे कोता? याची सध्या चर्चा रंगली आहे. तसेच त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही कौतुक केले आहे.

अब्दुल सत्तार हे नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांच्यावर आधी गायरान जमीन प्रकरण, त्यानंतर कृषी महोत्सवाच्या नावाने पैसे गोळा केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. तर आता टीका करताना केलेल्या विधानावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत.

अहमदनगरच्या (Ahmednagar) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या पदवीदान समारंभाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं.

Abdul sattar News
MLA Pravin Datke म्हणाले, इतक्या झपाट्याने बदललेले दुसरे शहर देशात नाही...

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. अनेक पक्षातील लोकं त्यांच्या कामावर खुश आहेत. ते सध्या गतीमान सरकार चालवत आहेत. तर एकनाथ शिंदे हे जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध होतात, अशी त्यांची ओळक आहे '', असं म्हणत नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात केलेल्या प्रवेशाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

तसेच अंबादास दानवे यांनी केलेल्या टिकेला त्यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, ''ज्यांनी-ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटाने मारले पाहिजे, त्यांना दोन बायका करण्याचा धर्माने अधिकार दिलाय का?'' असा सवाल करत ''जर अधिकार असेल तर बुटाने मारू नका, पण नसेल तर त्यांना जरूर मारा'', असं बोलत त्यांनी रोख व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा, मुख्यमंत्री हे सर्व सामान्यांचे आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे त्यांनी कौतुक केले.

Abdul sattar News
महापुरुषांची मापे काढायची आपली लायकी आहेत का; सर्वपक्षीय वाचाळवीरांना जाणकरांचा सवाल !

अंबादास दानवे काय म्हणाले होते?

अंबादास दानवे शिंदे गटावर टीका करताना आज आमदार वाणी असते तर गद्दारांना त्यांनी बुटानेच मारले असते, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले होते. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देत अब्दुल सत्तार यांनी निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in