गुजरातप्रमाणे मेडिकल प्रवेशासाठी गुणवत्ता यादीनूसार प्रवेश प्रक्रिया सुरु करा

सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी स्थगिती दिलेली नाही. केवळ त्या गुणवत्ता यादीचा निकाल घोषीत करता येणार नाही. (Medical Admission)
MlaSambhaji Patil Nilangekar-Uddhav Thackeray Medical Admission

MlaSambhaji Patil Nilangekar-Uddhav Thackeray Medical Admission

Sarkarnama

लातूर : वैद्यकीय प्रवेशासाठी महत्वाच्या असलेल्या नीट परीक्षेचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी देखील राज्यातील वैद्यकीय प्रवेश (Amit Deshmukh) प्रक्रिया सुरु झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांच्या वेळेची बचत व्हावी याकरीता राज्य गुणवत्ता यादीपर्यंतची ही प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरु करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Smbhaji Patil Nilangekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा क्रमप्राप्त आहे. यावर्षी नीट परीक्षा १२ सप्टेंबरला पार पडली असून १ नोव्हेंबरला त्याचा निकालही लागला आहे. यानंतर होणारी वैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया मात्र सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल झाल्याने थांबलेली आहे. या याचिकेवर ६ जानेवारी २०२२ रोजी सुनावणी होणार असल्यानेच ही प्रवेश प्रक्रिया सध्या झालेली नाही.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी स्थगिती दिलेली नाही. केवळ त्या गुणवत्ता यादीचा निकाल घोषीत करता येणार नाही. ही बाब लक्षात घेऊन देशातील गुजरात, कर्नाटक यासह इतर राज्याने गुणवत्ता यादी प्रक्रिया पुर्ण करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. कांही राज्याची ही प्रक्रिया पुर्णही झाली असून सदर प्रक्रिया पुर्ण झाल्याने विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी एक ते दीड महिन्याच्या कालावधीची बचत होणार आहे.

देशातील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्र राज्याने सुद्धा विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत आणि त्यांचे हित लक्षात घेऊन गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर करत महाराष्ट्र सरकारने ही प्रक्रिया पुर्ण केल्यास निश्चितच विद्यार्थ्यांचे हित साधून त्यांची व पालकांची फरफट थांबणार आहे.

<div class="paragraphs"><p>MlaSambhaji Patil Nilangekar-Uddhav Thackeray Medical Admission</p></div>
Nana Patoleःमला मंत्री होण्याची वेळ आली तरी ऊर्जा मंत्री होणार नाही..

सदर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असणारी गुणवत्ता यादीची प्रक्रिया पुर्ण करावी, असे देखील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com