
Marathwada Political News : छत्रपती संभाजीनगर येथे सारथी संस्थेचे वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (MLA Satish Chavan News) यांनी मंगळवारी, दि.१२ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. सदरील वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांची मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी भेट घेतली.
राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्यावतीने छत्रपती संभाजीनगर (Ajit Pawar) येथे विभागीय मुख्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (NCP) तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व लक्षीत गटातील लाभार्थ्यांसाठी अभ्यासिका, मुला-मुलींना वेगवेगळ वसतीगृह इत्यादी प्रयोजनासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती.
गारखेडा परिसरातील (छत्रपती संभाजीनगर) सी.टी.एस.क्र.15309 मधील 1.24 हे. आर जमीन नियोजन विभागास प्रदान (Marathwada) करण्यास तसेच सदर प्रकल्पाच्या बांधकाम व संचालनाचे काम सारथी संस्थेमार्फत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
मात्र सदरील प्रशासकीय मान्यता मिळवून वर्ष होऊनही अद्याप यासंदर्भात काहीच कार्यवाही झाली नाही. सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी चव्हाण यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत यासंदर्भात त्वरीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.