बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीत फूट ; शिवसेनेला डावलून काॅंग्रेसने केला अध्यक्ष..

काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेवर पहिल्यापासुन वर्चस्व राहिले आहे, शिवसेनेचा एखाद दुसरा संचालक निवडुन येण्याची शक्ती होती. (Osmanabad District)
Bapurao Patil, Madhukar Mote, Osmanabad
Bapurao Patil, Madhukar Mote, OsmanabadSarkarnama

उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या बापुराव पाटील यांची वर्णी लागली आहे. (Osmanabad) तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर मोटे हे निवडुन आले. शिवसेनेला बाजुला सारत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) फुट पडल्याचे दिसुन आले. आज अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड होणार होती. (Marathwada) नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविका आघाडीतील तीन्ही पक्षांनी एकत्रीत येत भाजपचा धुव्वा उडवला होता.

प्रत्येकी पाच जागा जिंकत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीनही पक्षांनी सर्व पंधरा जागा जिंकल्या होत्या. पण अध्यक्षपद कुणाला यावर एकमत न झाल्याने आघाडीत फूट पडली. पारंपारिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी व काॅंग्रेसने शिवसेनेला बाजूला सारत हातमिळवणी केली आणि अध्यक्ष, उपाध्यक्षपद पटकावले. काँग्रेसने बाजी मारत अध्यक्षपद पदरात पाडुन घेतले,तर राष्ट्रवादीच्या वाट्याला उपाध्यक्षपद आले.

राज्यपातळीवरुनही तोडगा न निघाल्याने शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी संजय देशमुख व उपाध्यक्षासाठी बळवंत तांबारे यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु या दोघांचा अकरा विरुध्द चार अशा मतांनी पराभव झाला. आघाडीमध्ये अध्यक्षपद

मिळविण्यासाठी तिन्ही पक्षाने गेल्या काही दिवसापासुन अंतर्गत शक्ती दाखविण्यास सूरुवात केली होती. सध्याच्या स्थितीला बँकेची स्थिती जरी अडचणीची असली तरी भविष्यात मात्र बँकेची स्थिती काही अंशी सुधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी बँकेचे अध्यक्षपद आपल्याकडे राहिले पाहिजे अशी भुमिका तिनही पक्षाकडुन व्यक्त केली गेली.

तेरणा व तुळजाभवानी कारखाने भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पार पडली असुन त्यातील तुळजाभवानी कारखाना तर सूरु देखील झाला आहे. तेऱणाच्या निविदाप्रक्रियेमध्ये तांत्रीक दोष काढल्याने ते प्रकरण न्यायालयात आहे. दोन ते अडीच महिन्यात त्याचाही दावा निकाली निघण्याची शक्यता आहे. साहजिकच हे दोन मोठे कारखाने भाड्याने दिल्याने बँकेला मोठा दिलासा मिळणार आहे.

Bapurao Patil, Madhukar Mote, Osmanabad
Beed : आमदारांकडूनच कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे ; पोलिस अधिक्षक सक्तीच्या रजेवर..

शिवाय पुढील काळात या शिखर बँकेने घेतलेली थकहमीची रक्कम देखील या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेही काहीप्रमाणात बँकेच्या स्थितीमध्ये फरक पडणार आहे. या पार्श्वभूमीवरच अध्यक्षपदासाठी तीन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. जिल्ह्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे जिल्हा बँकेवर पहिल्यापासुन वर्चस्व राहिले आहे, शिवसेनेचा एखाद दुसरा संचालक निवडुन येण्याची शक्ती होती. यंदा मात्र पाच जण निवडुन आल्याने पक्षाला मोठ बळ मिळाले आहे. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या प्रक्रियेत शिवसेनेला डावलल्याने पुन्हा सेनेला विरोधात बसण्याची वेळ आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com