सोशल मिडीयावर धूम असणाऱ्या चांगदेव गितेंच्या ‘धनुष्या’तून ‘बाण’ सुटणार का?

बीडमधील (Beed) पाटोदा, आष्टी, शिरुर कासार, वडवणी व केज नगर पंचायतींची निवडणूक (Nagar Panchayat Election) होत आहे.
Changdev Gite
Changdev Gite Sarkarnama

बीड : सोशल मिडीया फेम चांगदेव गिते (Changdeo Gite) यांनी आता निवडणुकीच्या रिंगणातही उडी घेतली आहे. उच्चशिक्षीत व बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला असणारे चांगदेव गिते (Changdeo Gite) यांना शिवसेनेने (Shivsena) उमेदवारी दिली आहे. सोशल मिडीयावर गितेंचे फॅन फॉलोअर्संही आहेत. आता त्यांचे गावकरी मतांतून त्यांना साथ देतात का, हे पहावे लागेल.

बीडमधील (Beed) पाटोदा, आष्टी, शिरुर कासार, वडवणी व केज नगर पंचायतींची निवडणुक होत आहे. ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द झाल्याने वरिल पाचही नगर पंचायतींच्या प्रत्येकी चार जागांची निवडणुक स्थगित होती. आता या जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. यात पाटोदा नगर पंचायतीतून चांगदेव गिते यांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्याने त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह भेटले आहे. त्यांचे त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात नशिब आजमविण्याचे ठरविले आहे.

Changdev Gite
परमबीरसिंहांना यापुढे कोणतेही संरक्षण नाही; सर्वोच्च न्यायालयाचा दणका

- कोण आहेत चांगदेव गिते

मुळगाव गितेवाडी हे पाटोदा नगर पंचायतीच्या हद्दीत आहे. औषधनिर्माणशास्त्र विषयातील पदवीधर चांगदेव गिते पुण्याला (Pune) मोठ्या कंपनीत नोकरीलाही आहेत. मात्र, त्यांनी आपल्या मातीची नाळ तुटू दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक प्रश्नांवर यापूर्वी अनेकदा आवाज उठविला आहे. त्यांनी काही आंदोलनेही केली आहेत. सोशल मिडीयावरील त्यांच्या मतांना लाईक, कमेंटच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद असतो. आता त्यांनी लोकांना मत देण्यासाठी साद घातली आहे.

‘सुशिक्षीत लोकांनी राजकारणाकडे अजिबात दुर्लक्ष करु नये, अन्यथा तुम्हाला मुर्खांचे गुलाम व्हावे लागेल’ असे आवाहन केले आहे. या आवाहनाला त्यांचे गावकरी व आडनावकरी किती प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे. त्यांना भाजपचे रोहिदास गिते, राष्ट्रवादीचे अबुलक घुगे यांचे कडवे आव्हान आहे. पाटोदा नगर पंचायतीत भाजपची सत्ता होती. त्यामुळे या सत्तापक्षाचा मुकाबला गिते कसा करतात हे पहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in