
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर भाजपच्या (Bjp) वतीने आज महापालिकेवर जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले. (Dhananjay Munde Latest Marathi News)
धनंजय मुंडे अंबाजोगाई येथे कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, हा जल आक्रोश मोर्चा नव्हे तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश मोर्चा असल्याचा खोचक टोला मुंडे यांनी लगावला. पावसाळ्याच्या तोंडावर जल आक्रोश मोर्चा नाही, तर भाजप नेत्यांच्या आतला आक्रोश बाहेर आल्याचे मुंडे म्हणाले. यावेळी त्यांनी इंदर दर कपातीवरुनही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. अगोदर इंधन दरवाढीचे सेंचुरी करायची आणि मग कमी केली म्हणुन दाखवायचे. केंद्र सरकारने देशाच्या सामान्य जनतेची फसवणूक केली, असा आरोप त्यांनी केला.
फडणवीस काय म्हणाले होते, झुकेगा नही साला, म्हणत मुंबईत रस्त्यावर उतरलेल्या ८० वर्षाच्या आजीच्या घरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले. आज औरंगाबादेत पाण्यासाठी डोक्यावर हड्डा घेऊन ८० वर्षाच्या आजी सहभागी झाल्या होत्या. त्यांचा आक्रोश मुख्यमंत्र्यांचा कानावर जाईल का? या आजीला भेटायला ते येतील का?
संभाजीनगर करायचे कशाला ते तर झाले आहे, असे समजा म्हणणारे मुख्यमंत्री कदाचित उद्या नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा असेही म्हणतील, असा टोला देखील फडणवीसांनी जल आक्रोश मोर्चातून उद्धव ठाकरेंना लगावला. औरंगाबाद (Aurangabad) तर आम्ही जिंकणारच, पाणीही आणणार, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.