आरोग्य मंत्र्यांच्या इशाऱ्याने तळीरामांची पंचायत; दारुचे भविष्य आता गर्दीवर अवलंबून

राज्यातील कोरोनाचा (Corona virus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने आज रात्रीपासून राज्यात अंशत: निर्बंध लागू केले आहेत.
आरोग्य मंत्र्यांच्या इशाऱ्याने तळीरामांची पंचायत; दारुचे भविष्य आता गर्दीवर अवलंबून
Liquor Store Guideline Updates in Maharashtra

जालना: राज्यातील कोरोनाचा (Corona) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने आज रात्रीपासून राज्यात अंशत: निर्बंध लागू केले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला निर्बंध पाळण्याचे आवाहन केले.

मात्र जर जनतेने हे निर्बंध पाळले नाहीत, गर्दी केली, नियमांचे उल्लंघन केले तर दारूची दुकानेही बंद करणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिला.(Liquor Shops Guideline Updates in Maharashtra) जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्यात वाढ होत असल्यानं नवे निर्बंध लागू केले आहेत. राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Liquor Store Guideline Updates in Maharashtra
कुठलाही लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही; पण...

राजेश टोपे यांनी याबाबत काही महत्त्वाचे खुलासेही केले आहेत. सध्या लागू केलेल्या निर्बंधामध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.(School Guideline Updates in Maharashtra) मात्र दारुची दुकानं सुरु असल्याने विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यामुळे निर्बंध लावूनही लोक गर्दी करत असतील तर, दारुची दुकानंही बंद करावी लागतील, असा इशारा राजेश टोपेंनी दिला आहे.

त्याचबरोबर धार्मिक स्थळांवरही गर्दी होत असेल तर त्याबाबतही टप्प्याटप्यानं निर्णय घेतला जाईल. राज्यात ऑक्सीजनची मागणीत अद्याप वाढ झालेली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षांवरील कोरोना झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढला असल्याचा, खुलासाही त्यांनी केला आहे.त्यामुळे आयसीएमआर (ICMR) ने त्याबाबत काही सूचना केल्यास त्याची अंमलबजावणी केली जाईल, असही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुंबईतील कोविड सेंटरमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय दरम्यान तक्रारीनंतर पारदर्शक चौकशी करून कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

Liquor Store Guideline Updates in Maharashtra
जिम आणि ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार, पण...

दरम्यान, रविवार रात्रीपासून (ता. 9) हे नियम लागू केले जाणार आहेत. रात्री १० ते सकाळी ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सलून 50% क्षमतेने रात्री १० पर्यंत चालू ठेवता येणार आहेत. जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, पर्यटन केंद्र , किल्ले, म्युजियम बंद करण्यात येणार आहे. शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मॅाल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे. रात्री दहा नंतर ते बंद असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत.

हॉटेल 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र, रात्री दहा वाजता ते बंद करावे लागणार आहे. नाट्यगृज सिनेमागृह 50% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच खासगी कार्यालये ५० टक्के शमतेने सुरु ठेवता येणार आहेत. कार्यालयात येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.