'तर... मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार सोपवावा'

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) प्रकृतीच्या कारणास्तव राज्य कारभारापासून दूर आहेत.
'तर... मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार सोपवावा'
Aditya Thackeray

लातूर : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) प्रकृतीच्या कारणास्तव राज्य कारभारापासून दूर आहेत. तर राज्याच्या राजकीय वर्तुळातही अनेक घडामोडींना ऊत आला आहे. हीच संधी साधत भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर(mla sambhaji patil Nilangekar) यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

''राज्याला अनागोंदीपासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thakrey) यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार (jit pawar) किंवा अन्य सहकाऱ्यांकडे सोपवावी, असे म्हणत संभाजी पाटील निलंगेकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच, मुख्यमंत्र ठाकरे यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, पण अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरेंकडे (Aditya thakrey) मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या,'' अशी मागणी त्यांनी केली आहे.

Aditya Thackeray
भाजप लोकप्रतिनिधींना सत्ता नसल्याची झळ बसल्याने अस्वस्थता!

''२२ नोव्हेंबर २०२१ ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री नाही, मंत्रिमंडळातील मंत्रीही भरकटले आहेत. कोरोनची तिसरी लाट सुरु झाली असताना कायदा सुव्यवस्थाही बिघडत चालली आहे. राज्यात गुन्हेगारीची प्रकरणे वाढत आहेत. ही राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री दैनंदिन कारभारात लक्ष घालू शकत नसतील त्यांनी राज्याचा पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची हीच वेळ आहे, असे निलंगेकरांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in