तर मग महाराष्ट्र केंद्रशाशित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या

(Dr. Pritam Munde says,State accuses of not providing imperial data) ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप बाळबोध.
Dr.Pritam Munde
Dr.Pritam MundeSarkarnama

बीड : महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांत सरकारला एकही मुद्द्यावर यश आलेले नाही. प्रत्येक अपयशासाठी केंद्राकडे बोट दाखविले जाते. मग, महाराष्ट्र सरकार केंद्रशासित करा आणि केंद्र सरकारला चालवायला द्या, असा टोला, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी लगावला.

ओबीसी आरक्षण देखील राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. केंद्र सरकार इम्पेरिकल डेटा देत नसल्याचा राज्याचा आरोप ‘बाळबोध’असल्याचा टोलाही डॉ. मुंडे यांनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत लगावला. सरकारकडे आमदार, मंत्र्यांसाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्नांऐवजी फक्त टिका - टिप्पण्णी करण्यासाठी माध्यमांसमोर येतात, असेही डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या.

राज्य सरकारने आयेागामार्फत डाटा गोळा करावा, यासाठी आयोगाला निधी उपलब्ध करुन द्यावा. फक्त शाहू, फुले, आंबेडकरांचे भाषणांमध्ये नाव घेणारे कृतीत वागत नाहीत. राज्याच्या वेळकाढूपणामुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली. हा राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ओबीसींवर झालेला अन्याय असून ओबीसींचे असलेले आरक्षण घालवण्याचे पाप या सरकारने केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

सर्वच घटकांवर सरकारने अन्याय केल्याने ते नाराज आहेत. आता सामान्य लोकांनीच सरकारला जागा दाखवावी, असेही डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या. बीड पोलिस नाही तीथे सजग आहेत, लागलीच गुन्हा नोंद करुन अटकही करतात. परंतु, स्त्रीयांवरील अत्याचार, माफियागीरी यावर गप्प राहतात. यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत.

Dr.Pritam Munde
हवामान बदलातील अचूक माहिती देणारे सी बँड रडार औरंगाबादेत बसवणार

पोलिस दल कोणाच्या हातचे बाहुले असल्याची टिका करत एकमेव परिविक्षाधिन अधिकारी पंकज कुमावत यांचे काम मात्र चांगले असल्याचे डॉ. मुंडे यांनी नमूद केले. कोणीतरी चांगले काम करत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com