Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama

...,तर मी माफी मागण्यास तयार : अमोल मिटकरी

मी केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रणित संघटनांनी विपर्यास केलेला आहे, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

पुणे : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपूर, सांगली येथील सभेत केलेल्या वक्तव्याविरोधात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आमदार मिटकरी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी माफी मागण्या तयार आहे मात्र, राजा शिवछत्रपती या कादंबरीत जी बदनामी करण्यात आली आणि याचा पुरस्कार करणारे वातावरण सध्या महाराष्ट्र मध्ये आहे. पुरंदरे यांनी लिहिलेल्या या कादंबरीबद्दल माफी मागावी, त्यानंतर आपणही केलेल्या वक्तव्यावर माफी मागण्यास तयार असल्याचे मिटकरींनी म्हटले आहे.

Amol Mitkari
मिटकरींचे 'ते' मत वैयक्तिक : दिलगिरी व्यक्त करत पाटील-मुंडेंनी संपवला विषय

मिटकरी म्हणाले, मी केलेल्या वक्तव्याचा भाजप प्रणित संघटनांनी विपर्यास केलेला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करत असून माझा पक्षाची ती शिकवण नाही. मी एक सामाजिक कार्यकर्ता असून जी लोक आज मी माफी मागावी म्हणत आहे त्या लोकांना माझे आव्हान आहे. राजा शिवछत्रपती या कादंबरीत जी बदनामी झाली आणि याचा पुरस्कार करणारे वातावरण सध्या महाराष्ट्रत आहे. पुरंदरे यांनी लिहिलेल्या या कादंबरीबद्दल माफी मागावी, तसेच, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जे विधान केले त्याबद्दलही माफी मागावी तरच मी माफी मागण्यास तयार असल्याचे मिटकरींनी म्हटले आहे.

आज राज्यभरात मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेल्या असता ब्राम्हण समाज बांधवांनी त्यांनी घेराव घालत मिटकरींनी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली व आपण त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. तर आपण या संदर्भात ट्वीट करत निषेध नोंदवावा असा अग्रह सुद्धा यावेळी करण्यात आला होता. मात्र, सुळे यांनी या प्रकरणाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे सांगत वेळ मारून नेली व समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Amol Mitkari
राजकीय वाटचालीत ब्राम्हण समाज सावलीसारखा माझ्यासोबत: त्या घटनेवर मुंडेंचे स्पष्टीकरण

दरम्यान, मिटकरी यांनी या प्रकरणानंतर आपण माफी मागणार नसल्याचे म्हंटले आहे. माफी कशासाठी मागायची असा सवाल त्यांनी केला होता. इस्लामपुरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील मिटकरींनी यांनी ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे उच्चारून खिल्ली उडवली, त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कुत्सितपणे हसत होते असाही आरोप करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com