BJP Political News: ...म्हणून भाजप आमदारावर आली मुंबईतील तब्बल दहा कोटींच्या आलिशान घरावर पाणी सोडण्याची वेळ !

Mumbai Mhada Home Scheme 2023: बदनापूरच्या भाजप आमदाराला ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे साडेसात कोटींचे घर मिळाले होते.
Mla Narayan Kuche News
Mla Narayan Kuche NewsSarkarnama

Mumbai Mhada News: 'गदर' चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना अभिनेता आणि खासदार सनी देओलचा जुहू येथील ‘सनी व्हिला’हा बंगला बँक ऑफ बडोदाने 56 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द करण्यात आल्याचं सोमवारी बँकेनं स्पष्ट केलं.

एकीकडे भाजप खासदाराच्या बंगल्याची लिलावाची चर्चा थांबत नाही, तोच आता भाजप आमदारावर बॅंकेचे कर्ज मिळत नसल्याने म्हाडाच्या लॉटरीत लागलेल्या तब्बल दहा कोटींच्या आलिशान घरावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

Mla Narayan Kuche News
MLA Narayan Kuche News: कुचेंचे नशीब कराडांपेक्षा भारी, साडेसात कोटींच्या म्हाडाच्या घराची लाॅटरी..

दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील आलिशान घरांसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडां(Bhagwat Karad) सह जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्याकडूनही अर्ज करण्यात आला होता. पण कुचे यांचं नशीब फळफळल्याने मंत्री कराडांना म्हाडाच्या घरासाठी 'वेट अॅण्ड वॉच' करावे लागले. पण आता कुचे यांचं दक्षिण मुंबईत आलिशान घर घेण्याचं स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. यामुळे कराडांच्या मुंबईतील आलिशान घरासाठीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांची सोडत काढण्यात आली. त्यात मुंबईतील ताडदेवमध्ये आमदार नारायण कुचे(Narayan Kuche) यांना मुंबईत घर घ्यायचे होते. त्यांना म्हाडाच्या सोडतीत दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील साडेसात कोटींचे घर जिंकले होते. या घराची अंदाजे किंमत दहा कोटी होती. मात्र, दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर कुचे यांना म्हाडाच्या लॉटरीत लागले होते. पण आता हेच म्हाडाचं आलिशान घर आमदार नारायण कुचे यांनी सोडलं आहे.

Mla Narayan Kuche News
BJP for Sharad Pawar : भाजप नेते शरद पवारांबाबत `सॉफ्ट`; निवडणुकीसह 'हे' आहे खास कारण

बदनापूरचे भाजप (BJP) आमदार कुचे यांना ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे साडेसात कोटींचे घर मिळाले होते. पण आता कुचे यांनी हे घर सोडले आहेत. पुरेसे कर्ज मिळत नसल्याने कुचे यांनी हे घर सोडले आहेत. आधी भागवत कराडांसाठी कुचे यांनी घर सोडले असल्याची चर्चा होती. मात्र, भागवत कराडांसाठी नाही तर आर्थिक परिस्थिती कर्ज घेण्यासारखी नसल्याने घर सोडल्याची माहिती कुचे यांनी दिली आहे. तसेच मला दोन घर लागली होती, पण मी ते दोन्हीही घरे सोडली असल्याचं कुचे म्हणाले आहेत.

कोण आहेत कुचे ...?

नारायण कुचे हे छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील मुकुंदवाडी या राखीव वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोनवेळा ते नगरसेवक होते, दरम्यान, २०१४-१५ मध्ये ते स्थायी समितीचे सभापती देखील होते. स्वप्नात देखील आपण आमदार होऊ, असे त्यांना कधी वाटले नसले. पण म्हणतात ना, `उपरवाला जब देता है तो छप्पर फाड के`, असंच काहीस कुचे यांच्या बाबतीत देखील घडल. बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसिचित जाती एससी प्रवर्गसाठी राखीव झाला. २०१४ ची निवडणूक जाहीर झाली तेव्हा भाजपकडे या मतदारसंघासाठी उमेदवारच नव्हता. मग अचानक शोधाशोध सुरू झाली आणि नारायण कुचे यांच्यापाशी येऊन हा शोध थांबला.

Mla Narayan Kuche News
PM Candidature Face: मोदींनंतर पंतप्रधानपदासाठी पसंतीचा चेहरा कोण? अमित शाह, गडकरी की योगी?

म्हाडाच्या फ्लॅटची लाॅटरी लागल्याने कुचे पुन्हा चर्चेत

भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुकुंदवाडीतील या नगरसेवकाला थेट बदनापूर विधानसभेची उमेदवारी दिली आणि पहिल्याच प्रयत्नात कुचे आमदार झाले. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात भरघोस निधीही मिळाला आणि २०१९ ची उमेदवारीही पक्की झाली. पाच वर्षाच्या राजकीय अनुभवातून आणि दानवेंचा हात पाठीवर असल्याने कुचे २०१९ मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले. ते म्हाडाच्या फ्लॅटची लाॅटरी लागल्याने कुचे पुन्हा चर्चेत आले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in