Smriti Irani News : स्मृती इराणींसोबत सेल्फीसाठी महिलांची झुंबड..

Chhatrapati Sambhajinagar : जी-20 महिला परिषदेच्या उद्धाटनासाठी इराणी आज औरंगाबादेत आल्या होत्या.
Selfi With Smriti Irani News
Selfi With Smriti Irani NewsSarkarnama

Bjp : केंद्रीय बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती. लाभार्थी महिलांसोबतच (Bjp) भाजपच्या पदाधिकाऱी, कार्यकर्त्यांनी देखील यावेळी इराणी यांच्यासोबत सेल्फी काढून घेतल्या. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थी महिलांसोबत सेल्फी घेण्याचे अभियान भाजपच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

Selfi With Smriti Irani News
G-20 News : नव्या बदललेल्या डिजीटल इंडियाची चावी महिलांच्या हाती..

या मोहिमेची सुरुवात स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी आज केली. देशभरातील १ कोटी लाभार्थी महिलांसोबत (Women) इराणी सेल्फी काढणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरातून करण्यात आला. जी-20 महिला परिषदेच्या उद्धाटनासाठी इराणी आज औरंगाबादेत आल्या होत्या.

या निमित्त विविध बैठकांना हजेरी लावल्यानंतर त्यांनी सेल्फी विथ लाभार्थी कार्यक्रमात हजेरी लावली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, चौदा महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली आहे.

भाजपच्या वतीने दिल्ली ते गल्ली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यानूसार केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ ज्या नागरिकांनी घेतला आहे, त्यांच्यासोबत सेल्फी आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जात आहे.

औरंगाबादेत या सेल्फी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. सभागृहात महिलांची मोठी गर्दी झाली होती. इराणी यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार महिलांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com