'वंचित'च्या बांगरवर झोपडपट्टी दादा कायद्याने कारवाई
VBA BeedSarkarnama

'वंचित'च्या बांगरवर झोपडपट्टी दादा कायद्याने कारवाई

सकाळी साडेदहा वाजता बेलापूर येथे एका लॉजमधून बांगर यांना ताब्यात घेऊन सायंकाळी बीडला आणले. त्यानंतर औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. (Beed District)

बीड : वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष व वंचित ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यावर एमपीडीए (Vanchit Bahujan Aghadi) (महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा) नुसार कारवाई करण्यात आली. (Beed) शिवाजीनगर पोलिस ठाणे व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने शनिवारी (ता. आठ) त्यांना मुंबईतील बेलापूर येथील एका लॉजमधून ताब्यात घेतले.(Marathwada)

शिवराज बांगर यांच्यावर एकूण सात गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा प्रस्ताव शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी हा प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना सादर केला.

शर्मा यांनी ता. ३१ डिसेंबरला या प्रस्तावाला मान्यता दिली. तेव्हापासून बांगर यांचा शोध सुरू होता. बांगर मुंबईतील बेलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक आर. राजा, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक हनुमंत खेडकर, हवालदार रामदास तांदळे यांचे पथक रवाना झाले.

तांत्रिक तपासाआधारे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बेलापूर येथे एका लॉजमधून बांगर यांना ताब्यात घेऊन सायंकाळी बीडला आणले. त्यानंतर औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. दरम्यान, शिवराज बांगर यांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अन्वये केलेली कारवाई चुकीच्या पद्धतीने असून त्यांच्या व मानवी जीवनाच्या नैसर्गीक हक्काविरुद्ध आहे.

VBA Beed
जिल्हा दुध संघ : मातब्बरांना पराभवाची धुळ; सत्ताधारी आघाडीचा मोठा विजय

सदर कारवाई थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव के. के. वडमारे, युवा सेना जिल्हाधिकारी सागर बहिर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक संगीता चव्हाण, छावाचे गंगाधर काळकुटे, डीपीआयचे अजिंक्य चांदणे, एएमआयएमचे शेख अमर, नगरसेविका जयश्री विधाते, लिंबागणेशच्या सरपंच निकीता गलधर, नगर पालिकेचे सभापती विनोद मुळूक, भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर आदींनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in