Shrikant Shinde : खोके मोजण्याची सवय, म्हणून त्यांना स्वप्नातही तेच दिसतं..

कृषीमंत्री सत्तार हे शपथ घेतल्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जातायेत, त्याच्या घरात राहत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळते. (Shirikant Shinde)
Mp Shrikant Shinde News, Aurangabad
Mp Shrikant Shinde News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिंदे सरकारमधील मंत्री, आमदारांवर ५० खोके घेतल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकारण पेटलेले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या विधानवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या विषयाला हात घालत मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Mp Shrikant Shinde News, Aurangabad
Shivsena : अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा या परस्पर विरोधी गोष्टी..

युवानेते आणि त्यांचे वडिल माजी मुख्यमंत्री यांना सध्या फक्त तीनच शब्द माहित आहेत गद्दार, खोके आणि खंजीर. (Aditya Thackeray) ज्यांना कायम खोके मोजायची सवय होती, ज्यांच्या डोक्यात खोक्यांचाच विचार होता, त्यांना दुसरे काही सुचत नाही म्हणून ते आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करत आहेत. (Abdul Sattar) त्यांना रात्री झोपेत आणि स्वप्नात देखील खोकच दिसतात, असा टोला शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

पण मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश कॅगने दिले आहेत, तेव्हा आता सगंळ बाहेर येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत श्रीकांत शिंदे यांच्या टीकेचा संपुर्ण रोख हा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावरच होता.

श्रीकांत शिंदे म्हणाले, ज्यांना मुंबई आणि बांद्रा याच्यापलीकडे काही माहित नव्हते, त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला भाग पाडले. बांद्रा ते बांधा असा त्याचा प्रवास सुरू झाला आहे. आम्हाला शेतीतलं काही कळत नाही असे सांगणारे मग शेतात जाऊन कशाची पाहणी करणार आहेत? आमचा शेतकरी हा शोपीस आहे का? की प्राणी आहे, ज्याला तुम्हा पहायला आला आहात. ज्वारी आणि मकाचे कणीस दाखवले तर त्यांना कळणार नाही. बोंड, बोंड अळी, शंख अळी काय? ते त्यांना विचारा असा चिमटा देखील श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना काढला.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावरून गदारोळ आणि राजीनाम्याची मागणी होत असतांना शिंदे यांनी मात्र त्यांचे कौतुक केले. कृषीमंत्री सत्तार हे शपथ घेतल्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर जातायेत, त्याच्या घरात राहत आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळते. मग दहा मिनिटांच्या दौऱ्यात तुम्हाला शेतकऱ्यांचे दुःख कळणार आहे का? असा सवाल करतांनाच शेती करणारा मुख्यमंत्री या राज्याला मिळाला, त्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळते असेही शिंदे म्हणाले.

Mp Shrikant Shinde News, Aurangabad
Ncp : सत्तारांच्या विधानावर सुप्रिया शांत, पती सुळेंनी मात्र व्यक्त केले मत; स्त्री द्वेष्टे पुढारी..

आपल्या सरकारने एनडीआरएफची मदत दुप्पट केली, प्रोत्साहनपर अनुदान ५० हजार दिले. आधीच्या सरकारने फक्त घोषणा केल्या, मदत आम्ही करतो आहोत, असेही शिंदे म्हणाले. कोविडच्या नावाखाली स्वतः घरात बंद राहिले आणि लोकांनाही बंद ठेवले. आता सत्ता गेल्यानंतर तडफडीतून बोहर पडले. बांधावर जातायं पण या सिल्लोडमध्ये काय पिकतं हे तरी माहित आहे का? पिकांचा स्पर्श कळावा लागतो, पायाला चिखल लागावा लागतो. नाईट लाईफची मागणी करणाऱ्यांना काळ्या आईचे दुःख कसे कळणार? असा सवाल देखील शिंदे यांनी केला.

शिंदेसाहेब सोळाव्या वर्षापासून राजकारणात आहेत, संघटनेसाठी चाळीस वर्ष त्यांनी दिली. संकटात सगळ्यात आधी कोण पोहचत असेल तर ते शिंदे साहेब. त्यांनी आपले सर्वस्व संघटनेला दिले. म्हणून सत्तेला लाथ मारून ९ मंत्री शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून बाहेर पडले. त्यामुळे गद्दारी आम्ही नाही, तर तु्म्ही केली. हमने ना दल बदला है, ना दिल बदला है, गद्दारी तुमने की है, तुमने तो जमीर बदला है, अशा शब्दात शिंदेनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

इतका संवेदनशील मुख्यमंत्री या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला असेल. वर्षाची दारं सगळ्यांसाठी खुली आहेत. शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणारे आपले मुख्यमंत्री आहेत. आनंदाचा शिधा ७ कोटी लोकांना दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in