Haribhau Bagde : पवारांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेव्हा गप्प, अन् आता राजकारण..

Aurangabad Political : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरात जाऊन शिवाजी महाराजांचे फोटो वाटले महाराज घराघरात पोहचवले.
Haribhau Bagde Speech News, Aurangabad
Haribhau Bagde Speech News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अनवधानाने झालेल्या उल्लेखावरून विरोधक आणि विविध राजकीय पक्ष राजकारण करत आहेत. Bjp ते आता बंद झाले पाहिजे, आमच्यावर टीका करणारे जेव्हा शरदराव पवारांनी चुकून का होईना एकेरी उल्लेख केला होता, तेव्हा का बोलले नाही? गप्प का होते? असा सवाल विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी केला आहे.

Haribhau Bagde Speech News, Aurangabad
Beed : वंचित-अपक्षांमुळे राजकीय विरोधक धनंजय-पंकजा मुंडे एकाच बॅनरवर

सिडकोतील जयभवानी नगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन प्रसंगी बागडे बोलत होते. (Sharad Pawar) संभाजी भिडे हे गेली ३२ वर्ष शिवनेरी, प्रतापगडावर जावून फुले वाहतात, पण त्यांच्यावर टीका करणारे विरोधक कधी महाराजांच्या दर्शनसाठी तिथे गेले होते का? असा टोला देखील बागडे (Haribhau Bagde) यांनी लगावला.

सध्या राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरूषांबद्दल केल्या जाणाऱ्या अवमानकारक विधानाबद्दल संघर्ष सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलतांना शिवाजी महाराजांना जुने आदर्श ठरवत वादग्रस्त विधान केले होते. मंगल प्रभात लोढा, प्रसाद लाड, रावसाहेब दानवे आणि आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील महापुरुषांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

अशातच विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी शरद पवारांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा करत विरोधक तेव्हा काही का बोलले नाही? असा प्रश्न उपस्थितीत केला आहे. बागडे म्हणाले, अनावधानाने केलेल्या विधानावरून विरोधक राजकारण करत आहेत. राज्यात सध्या शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण करणे सुरू आहे, ते आता सगळ्याच राजकीय पक्षांनी बंद केले पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पुर्ण झाली होती तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घराघरात जाऊन शिवाजी महाराजांचे फोटो वाटले होते, शिवाजी महाराज घराघरात पोहचवले होते. पण चुकून एखादा शब्द बोलला गेला तर त्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे. शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यानांच आदर आहे. ते केवळ महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही तर जगाचे आदर्श आहेत. पण त्यांच्या नावावरून राजकारण करणे आता संघटना आणि राजकीय पक्षांनी बंद करावे, याचा पुनरुच्चार देखील बागडे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com