पिलावळांनी स्वतःची उंची, नेत्याचा प्रामाणिकपणा तपासावा ; जिल्हाउपाध्यक्षांनी समर्थकांना सुनावले

गुत्तेदारीसाठी मागेपुढे फिरणाऱ्यांनी, गुत्तेदारी करावी,पक्ष नेतृत्वावर टिका करण्यापूर्वी, एका कुटुंबात किती पद आहेत,आपण किती प्रामाणिक आहोत याचा विचार करावा. (Beed News)
Bajarang Sonawne-Vijay Kender,Beed Ncp
Bajarang Sonawne-Vijay Kender,Beed NcpSarkarnama

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावर बजरंग सोनवणे यांच्या जागी राजेश्वर चव्हाण यांची नेमणूक होताच सोनवणे समर्थकांनी आपली नाराजी समाज माध्यमांवर प्रगट केली होती. (Beed) मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांनीच या समर्थकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी पोस्ट करत प्रत्युत्तर दिले आहे. (Ncp) पक्ष नेतृत्वावर टिका करणाऱ्या पिलावळानी स्वतःची उंची आणी आपल्या नेत्याचा प्रामाणिकपणा तपासावा, असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत.(Marathwada)

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केंद्रे देखील बजरंग सोनवणे यांच्याच केज तालुक्यातील आहेत. त्यांनी सोनवणे समर्थकांना फेसबुक पोस्ट लिहून उत्तर दिले आहे. जिल्हाध्यक्ष बदलानंतर सोनवणे समर्थकांनी ‘सांगा बप्पांचे काय चुकले? असा सवाल करत सोनवणेंनी पक्षासाठी दिलेल्या योगदानाची यादीच टाकली होती. सुरेश धस यांनी पक्ष सोडल्यानंतर आष्टी तालुक्यात पक्षवाढविण्यासाठी काम केल्यानेच तिथे राष्ट्रवादीचा आमदार विजयी झाला.

पक्षाचे जिल्हास्तरावर मोर्चे आयोजित केले. शेतकरी पुत्र म्हणून राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढविली, या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळेच विधानसभेला पक्षाचे चार आमदार विजयी झाले, तसेच विरोधकांच्या ताब्यातील जिल्हा परिषद पक्षाच्या ताब्यात आणून दिली, असे दावे सोनवणे समर्थकांकडून केले गेले. पक्षासाठी आहोरात्र झटलात, हेच तुमचे चुकले, प्रस्थापितांच्या घरी जन्म घेण्याऐवजी गरीबाच्या घरी जन्म घेतला हे चुकले, असे शल्यही यात व्यक्त केले.

चार वर्षे आठ जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळली मात्र पक्षाने काय दिले, असा सवालही उपस्थित करण्यात केला होता. याला आता राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केंद्रे यांनी सोशल मिडीयावरुनच उत्तर दिले आहे. ‘संघटनेने दिलेली पद आपण किती प्रामाणिक पणाने पक्षवाढीसाठी वापरली याचा अनुभव आहे आमच्याकडे.

जिल्ह्यात निवडून आलेल्या चार आमदारांचा ईसार घेण्या अगोदर, चारही नेत्यांनी सत्ता नसताना त्याच्या मतदार संघात केलेला संघर्ष, जनतेची केलेली काम, पक्षा सोबत प्रामाणिकपणा आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद या नेत्यांसोबत होता हे विसरू नका, असा टोला केंद्रे यांनी लगावला. गेली कित्येक वर्षे वेगवेगळी लाभाची पद भोगणारे हे महाशय स्वतःच्या मतदार संघात काय दिवा लावला हे सांगत नाहीत, मतदाना अगोदर हात वर करून बसले होते. आपली गटबाजी, जातीयद्वेष, यांच्या स्थानिक सर्व तडजोड्यांचा अनुभव आहे आम्हाला. त्यामुळं थोडं सांभाळून, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला.

Bajarang Sonawne-Vijay Kender,Beed Ncp
म्हणे गॅस लाईनसाठी नगरसेवक असतांना निवदेन दिले होते; दानवेंकडून खैरेंची खिल्ली

लोकसभेच्या मतांची आकडेवारी वारंवार सांगून स्वतःचा उदो उदो करण्यापूर्वी, जिल्हातील सहा मतदार संघातील नेत्यांची, कार्यकर्त्याची मेहनत, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेला संघर्ष आणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वयाच्या ८० व्या वर्षी केलेल्या कष्ठाचे ते फळ होते हे विसरू नका. गुत्तेदारीसाठी मागेपुढे फिरणाऱ्यांनी, गुत्तेदारी करावी,पक्ष नेतृत्वावर टिका करण्यापूर्वी, एका कुटुंबात किती पद आहेत,आपण किती प्रामाणिक आहोत याचा विचार करावा, नंतर प्रश्न विचारावेत असेही विजय केंद्रे यांनी सुनावले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com