
Parli Crime News : रासपचे (RSP) युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड (Rajabhau Phad) यांच्यावर परळी शहरात जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये त्यांचा पुतण्या आणि बॉडीगार्ड जखमी झाले असून राजाभाऊ फड यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे परळीत (Parli) एकच खळबळ उडाली आहे.
तर परळीत दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. कन्हेरवाडीचे सरपंच राजाभाऊ फड आणि त्यांच्याबरोबर असणऱ्या दोघाजणांवर हा हल्ला झाला. यावेळी राजाभाऊ फड यांच्या गाडीच्या काचा देखील फोडल्याचं सांगण्यात येत आहे. दोन गटात आधी राडा झाला व त्यानंतर याचं रुपांतर हाणामारीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. (Parli Crime News)
या हाणामारीत तिघेजण जखमी झाले असून यावेळी तेथे असणाऱ्या खुर्च्यांची देखील मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र ही घटना नेमकी का घडली? याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, राजाभाऊ फड हे रासप नेते आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचे जावई तर राष्ट्रीय समाज पक्षाचे (Rashtriya Samaj Paksha) युवक प्रदेशाध्यक्ष आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.