Shivsena : लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो..

बाबरी मशीद आम्ही पाडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेवर टीका करतांना फडणवीसांनी बाबरी पाडल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या भाजप नेत्यांची यादीच सभेत वाचून दाखवली होती. (Shivsena Aurangabad)
Shivsena : लाठीचार्ज झाला की पळणारे, म्हणे बाबरी पाडायला गेलो होतो..
Shivsena Mla Ambadas DanveSarkarnama

औरंगाबाद : भाजपचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्रदिनी मुंबईत झालेल्या बुस्टरडोस सभेत शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला. (Shivsena) मशिदीवरील भोंगे हटवायचे तर फाटली अन् म्हणे आम्ही बाबरी मशीद पाडली, अशा शब्दात फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेला टोला लगावला होता. याला शिवसेनेकडून जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले असून आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या फेसबुकपेजवरून फडणवीस यांचा एक फोटो शेअर करत चिमटा काढला आहे. (Aurangabad)

मोर्चामध्ये पोलिसांकडून लाठीमार होत असतांना फडणवीस हे पळून जातांनाचे जुने छायाचित्र पोस्ट करत दानवे यांनी ` लाठी चार्ज झाला की पळून जाणारे, म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होतो `, असे म्हणत खिल्ली उडवली आहे. राज्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या दोन सभा काल झाल्या. त्यातील एक मुंबईच्या सोमय्या मैदानावर तर दुसरी औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर.

मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर घणाघात केला तर इकडे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांना लक्ष्य करत लाऊडस्पीकरचा मुद्दा रेटला. मुंबई महापालिकेच्या निवडणुका पाहता फडणवीस यांनी आक्रमक भाषण केले, त्यांच्या भाषणाचा संपुर्ण रोख हा शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच होता. बाबरी मशीद आम्ही पाडल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेवर टीका करतांना फडणवीसांनी बाबरी पाडल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या भाजप नेत्यांची यादीच सभेत वाचून दाखवली होती.

Shivsena Mla Ambadas Danve
Dhnanjay Munde : एकदा समोरासमोर या, कोण किती जातीयवादी हे महाराष्ट्राला कळेल..

एवढेच नाही तर आपण स्वतः अयोध्येतील तो ढांचा पाडण्याच्या मोहिमेत सहभागी होतो, असा दावाही केला. त्यानंतर भाजप विरुद्ध शिवसेना असा आरोप-प्रत्यारोपांचा सामना राज्यभरात रंगला. शिवसेनेचे आमदार तथा औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी फडणवीस यांना टोला लगावणारे एक छायाचित्र आपल्या फेसबुकपेजवर टाकत भाजपला डिवचले आहे.

या छायाचित्रात फडणवीस हे अगदी युवामोर्चाचे काम करत असतांनाच्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या वेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी पळतांना दिसत आहेत. नेमकं यावरच बोट ठेवत दानवे यांनी लाठी चार्ज होताच पळून जाणारे म्हणे आम्ही बाबरी पाडायला गेलो होते, असे लिहित फडणवीस यांच्यावर टीकेचा बाण सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.