Shivsena V/s Shivsena UT Hingoli : वर्गणी जमा करून घर चालवतो ; तुम्ही मटका, दारू रेशनच्या हप्त्यावर जगता..

Hingoli : बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गटाचे काय झाले? हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळे बांगर यांच्या पाया खालची वाळू सरकली
Shivsena V/s Shivsena UT Higoli News
Shivsena V/s Shivsena UT Higoli NewsSarkarnama

Hingoli : शिवसेनेत फूट पडून दोन पक्ष तयार झाले तेव्हापासून दिल्ली ते गल्ली हे दोन्ही पक्ष एकमेकांवर तुटून पडतांना दिसतात. हिंगोलीचे आमदार तथा शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे (Vinayak Bhise) यांच्यात सध्या असाच संघर्ष होतांना दिसतो आहे. सोशल मिडियावर या दोघांमध्ये सध्या वाॅर सुरू आहे.

Shivsena V/s Shivsena UT Higoli News
Chhatrapati Sambhajingagr APMC : बहुमत मिळाल्यावरही धाकधूक, १४ संचालकांना बागडेंनी पाठवले गुजरातला..

एकेकाळी दोघेही सोबत काम करत असल्याने एकमेकांबद्दल त्यांना चांगल्या वाईट गोष्टी माहित आहे. (Shivsena) पण त्याचा वापर ते आता राजकारणासाठी करतांना दिसत आहेत. (Santosh Bangar)आमदार बांगर यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भिसे यांच्यावर टीका करतांना त्यांच्या तोंडावर असलेल्या व्रणाचा उल्लेख करत टीका केली.

अॅडिसडमुळे पडलेला हा व्रण भिसे आता हा मारहाणीतला व्रण असल्याचे सांगत आहेत. (Hingoli) वर्गणी जमा करून घर चालवणारा शिवसेना कशी चालवणार? अशी टीका केली, तर दुसरे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचा उल्लेख करत असा जिल्हाप्रमुख असतो का? असेही बांगर एका कार्यक्रमात म्हणाले होते.

त्यावर आता विनायक भिसे यांनी देखील बांगर यांच्यावर पलटवार केला आहे. माझे व्रण कशाचे आहेत, हे त्यांना चांगले माहिती आहेत. मटका, दारू, रेशनच्या हप्त्यावर घर चालविणाऱ्यांनी आम्हाला संभाजी महाराजांबद्दल शिकवू नये. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गटाचे काय झाले? हे सगळ्यांना माहित आहे, त्यामुळेच आमदार बांगर यांच्या पाया खालची वाळू सरकली असल्याचे भिसे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com