हातात दांडकं घ्या अन् संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाआड येणाऱ्यांना बाजूला करा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये जाहीर सभा
हातात दांडकं घ्या अन् संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाआड येणाऱ्यांना बाजूला करा : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeraysarkarnama

(Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

औरंगाबाद : मला येताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक पांडे भेटले. ते मला म्हणाले, साहेब तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगायचं आहे. म्हटलं डिटेल वगैरे काय नाही. हातात दांडकं घ्या आणि जो माझ्या संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाच्या आड येत असेल त्या झारीतील शुक्राचार्याला बाजूला करा, असं म्हणतं मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद पाणी प्रश्नावर भाष्य केले. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनाच्या सभेत बोलत होते. (Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

उद्धव ठाकरे म्हणाले, मी आज पाणी प्रश्नावर बोलणार आहे. कारण बाकीचे सगळे विषय मोठे आहेत, पण मी एक मुर्ख राजकारणी असेन, जिथे पाणी प्रश्न असताना देखील तिकडे पाठ फिरविण्याऐवजी मी जनतेला सामोरे जात आहे. याचे कारण एक प्रामाणिकपणा आहे. कुठेही फसवेगिरी नाही. मला कल्पना आहे, गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील पाणी प्रश्न अधिक बिकट होता. ५ दिवसांनी येणारे पाणी ८ ते १० दिवसांनी येत होते. (Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

मला माहित आहे, तुम्ही सगळे दुखः बाजूला ठेवून हिंदुत्वाच्या वेडापायी इकडे आले आहाता. पण तुमच्या मनामध्ये एक असेल की तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय, पण आमच्या नळाला पाणी नाही. त्यामुळे तुमचं हे बोलणं आमचा पाण्याचा हांडा भरणार आहे का? मात्र आता त्याच्यामध्ये सुधारणा झालीय का ते तुम्ही सांगायचं आहे. १० दिवसांपूर्वी, ५ दिवसांपूर्वी येणाऱ्या पाण्यामधील अंतर आता कमी होत आहे. जुन्या योजनेला सरकारकडून पैसे देण्याचे काम करणार आहे, अशीही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मला येताना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आणि महानगरपालिका आयुक्त आस्तिक पांडे भेटले. ते म्हणाले, साहेब तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगायचं आहे. मी म्हटलं डिटेल वगैरे काही नाही. सरळ हातात दांडकं घ्या आणि जो माझ्या संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाआड येत असेल त्या झारीतील शुक्राचार्याला बाजूला करा, आणि माझ्या संभाजीनगरला पाणी द्या. १९७२ सालची एक जुनी योजना आहे, त्यासाठी पैसे देणार आहे.(Uddhav Thackeray | Shivsena | Aurangabad | Latest News)

समांतर जलवाहिनीच्या योजनेचा पाठपुरावा करत आहे, त्यामुळेच केंद्रेकरांना सांगितले, हातात दांडकं घ्या, आणि जे कोणी वाकडे येतील त्यांना सरळ करा आणि ही योजना पूर्ण करा. मग एक प्रश्न पुढे आला, किंमती वाढल्या. स्टीलची, इतर जे काही सामान लागते, त्याच्या किंमती वाढल्या आहेत. महापालिकेकडे पैसा नाही. त्यामुळे परावाच्या कॅबिनेटमध्ये या योजनेसाठी पैसा देण्याचे काम आता शासन करणार आहे. यानंतरही जर कंत्राटदार अडून बसला तर त्याला सरळ उचला आणि आत टाका, असेही आदेश ठाकरे यांनी दिले.

मध्यंतरी कोणीतरी जलाक्रोश मोर्चा काढला. पण तो आक्रोश त्यांची सत्ता गेली म्हणून होता. संभाजीनगरसाठी नव्हता. जर पाण्यासाठी योजना असती तर यापूर्वीच का नाही केली? ५ वर्ष तुम्हीच तर सत्तेत बसला होता. किती पैसे दिले या योजनेला? का नाही सुरु केली? का नाही तुमच्या हस्ते याचे भूमिपुजन पार पडले? असा सवाल ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शहरातील रस्ते सुधारत आहेत. मी सगळे सुधारले असे म्हणतं नाही. पण रस्त्याच्या कामाला हात घातला आहे, सुधारतात. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, म्युझियम होत आहे, अॅक्वॅरियम, जंगल सफारी सुरु होत आहे. अगदी मेट्रोची आवश्यकता भासली तर त्यासाठी प्लॅन सुरु आहे. पण ही घोषणा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नाही. काहीही करा आणि मेट्रो आणा, मग शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल. पण आपली मेट्रोही संभाजीनगरची शान वाढविण्यासाठी असेल. शहराचे विद्रुपीकरण करणारे नसेल, असे म्हणतं त्यांनी औरंगाबाद मेट्रोचे संकेत दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in