Shivsena : औरंगाबादचे नामांतर लांबवण्याचा दोन सदस्यीय मंत्रीमंडळाचा खटाटोप..

टक्केवारीची भाषा करणारे आमदार संजय शिरसाट यांनी सुशिल खेडकर या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला का मारहाण केली होती? (Mla Ambadas Danve)
Mla Ambadas Danve News Aurangabad
Mla Ambadas Danve News AurangabadSarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामकरणाची प्रक्रिया पुर्ण केली होती. मात्र सत्तांतरानंतर केवळ श्रेय लाटण्यासाठी स्थगिती देऊन हिंदुत्वावार, संभाजीनगरकरांवर आघात केला होता. समस्त हिंदूंच्यावतीने शिवसेनेच्या जनरेट्यामुळे सरकारने दोन दिवसात (Aurangabad) औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करावे लागले. आता महिनाभरात शहराचे आणि विमानतळाचे केंद्र सरकारकडून नामांतर करून आणा, असे आव्हान (Shivsena) शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे - फडणवीस सरकारला दिले.

दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले शहराचे नामांतर करून ठाकरे यांनी शहरवासियांचे व शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न पुर्ण केले, मात्र या सरकारने स्थगिती देऊन जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. (Marathwada) हा हिंदुत्वावार आघात होता. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी शहराचे नामांतर केले नाही, चिकलठाणा विमानतळाला धर्मवीर संभाजी महाराज यांचे नाव देण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला तरीही दोन्ही नामांतरे करण्यात आले नाहीत. मात्र महाविकास आघाडीत ठाकरे सरकारने केलेल्या नामांतरला स्थगिती देण्यात आली.

शिवसेनेच्या आणि हिंदुत्वच्या जनरेट्यामुळे सरकारला संभाजीनगराच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागले. जनरेटा नसता तर या दोन सदस्यीय मंत्रीमंडळाने दोन दिवसात शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला नसता. आता केंद्रातही हिंदुत्ववादी सरकार आहे असे मानले जाते. असे जर असेल तर श्रेयवादाच्या बाहेर पडून औरंगाबादचे संभाजीनगर व विमानतळाचे धर्मवीर संभाजी महाराज नाव करून आणावे, असेही दानवे म्हणाले.

१९९८ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचा संभाजीनगर असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे सरकारने संभाजीनगर नावाची सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली आहे, सर्व एनओसी घेतलेल्या असताना आता छत्रपती संभाजीनगर असा विस्तार करण्याने ही प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता वाढली आहे. या शहराचे नामांतर लांबणीवर टाकण्याचाही या सरकारचा उद्देश असू शकतो.

Mla Ambadas Danve News Aurangabad
खैरेंना मुलाला मोठे करायचे आहे, माझा अडसर असल्याने हकालपट्टी ; जंजाळ यांचा आरोप

शिंदे गटाचे आमदार मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन करत आहेत, ते मंत्रीपदासाठी हपापलेले, चाटूगिरी करणारे मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन करत आहेत. उद्धव ठाकरे असताना त्यांना सर्व सहज मिळत गेले आता ती शाश्‍वती वाटत नाही यामुळे त्यांना मुंबईत जाऊन शक्तिप्रदर्शन करावे लागत आहे.

टक्केवारीची भाषा करणारे आमदार संजय शिरसाट यांनी सुशिल खेडकर या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला का मारहाण केली होती? असा सवाल करत टक्केवारीचे उत्तर खेडकर देतील. शिरसाट यांच्यासारखे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन टिका करणार नाही असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in