Shivsena : सत्तारांच्या बालेकिल्ल्यात माघार, पण भुमरेंच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार..

बुलडाणा आणि सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारल्यामुळे पैठणमध्ये तरी परवानगी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. (Aditya Thackeray)
Yuvasena Chief Aditya Thackeray News, Aurangabad
Yuvasena Chief Aditya Thackeray News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील जाहीर सभा रद्द करत माघार घेणाऱ्या शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात मात्र सभा घेणार आहेत. पैठण तालुक्यातील बालानगर येथे ठाकरे यांचा शिवसंवाद मेळावा होणार असून यासाठी पैठण ग्रामीण पोलिसांनी परवानगी देखील दिली आहे.

Yuvasena Chief Aditya Thackeray News, Aurangabad
Nanded : प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही..

त्यामुळे सत्तारांच्या सिल्लोडमध्ये माघार घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांची तोफ भुमरेंच्या मतदारसंघात मात्र धडाडणार आहे. (Paithan) राज्यातील सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे हे गद्दार ४० आमदारांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. राजीनामा देवून निवडणुकीला सामोरे जा असे आव्हान त्यांनी पहिल्या टप्यातील शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने दिले होते. तेव्हा देखील भुमरेंच्या मतदारसंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार मेळावा घेतला होता.

त्यानंतर आता दुसऱ्या टप्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह भुमरेंच्या पैठणमध्ये दुसऱ्यांदा ठाकरे जात आहेत. दरम्यान, सिल्लोडमधील ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली असून तिथे आता ते फक्त शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर लिहाखेडी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी आणि संवाद असा बदल करण्यात आला आहे.

यानंतर सत्तार यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्यावर रणछोडदास अशी टीका सत्तार यांनी केली होती. तर सभा ठरलीच नव्हती, असे घुमजाव विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले होते. त्यानंतर आता ठाकरे यांच्या पैठणमधील शिवसंवाद मेळाव्याचे काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जात होता.

बुलडाणा आणि सिल्लोडमधील सभेला परवानगी नाकारल्यामुळे पैठणमध्ये तरी परवानगी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु बालानगर येथील शिवसंवाद मेळाव्याला पोलिसांनी परवानगी दिली असून आता आदित्य ठाकरे दुसऱ्यांना भुमरेंच्या मतदारसंघात जाऊन भाषण करणार आहेत. ते भाषणात काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com