Shivsena : सुषमा अंधारे करणार भुमरे, सत्तारांचे `प्रबोधन`, १८ - १९ ला मतदारसंघात घेणार सभा..

येत्या 18 व 19 नोव्हेंबर रोजी अंधारे या पैठण आणि सिल्लोड मतदारसंघामध्ये प्रबोधन यात्रा घेऊन येत आहेत. या निमित्ताने अंधारे यांच्या दोन जाहीर सभा या ठिकाणी होणार आहेत. (Shivsena, Aurangabad)
Abdul Sattar-Bhumre-Andhare News, Aurangabad
Abdul Sattar-Bhumre-Andhare News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे सध्या आपल्या खुमासदार भाषणांमुळे राज्यभरात चर्चेत आहेत. विशेषत: शिंदे गटातील मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधींवर अंधारे अतिशय मार्मिक भाषेत टीका करत आहेत. त्यांची टीका विरोधकांना झोंबणारी असल्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये त्यांच्या भाषणाला परवानगी नाकारण्यात आली होती.

Abdul Sattar-Bhumre-Andhare News, Aurangabad
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'मी शिवबंधन तोडायला तयार, पण....'

मात्र सुषमा अंधारे या काही थांबायला तयार नाहीत. आता राज्याचे (Abdul Sattar) कृषिमंत्री अब्दुल सत्तार व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांचे `प्रबोधन` करण्यासाठी येत्या 18 व 19 नोव्हेंबर रोजी अंधारे या पैठण आणि सिल्लोड मतदारसंघामध्ये प्रबोधन यात्रा घेऊन येत आहेत. (Shivsena) या निमित्ताने अंधारे यांच्या दोन जाहीर सभा या ठिकाणी होणार आहेत.

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी नुकताच या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसंवाद दौरा केला होता. या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाला लोकांची प्रचंड सहानुभूती असल्याचे दिसून आले होते.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अलीकडच्या काळात केलेली विधानं, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वापरलेली गलिच्छ भाषा या पार्श्वभूमीवर त्यांच्याच मतदारसंघात जाऊन सुषमा अंधारे कशा पद्धतीने सत्तार यांचे प्रबोधन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर पाच वेळा आमदार आणि दोनदा राज्यात मंत्री झालेल्या संदिपान भुमरे यांचा समाचार अंधारे कशा घेतात याकडेही राज्याचे लक्ष असणार आहे. राज्यात शिंदे गटाने बंड केल्यानंतर त्याला औरंगाबाद जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळाला होता.

सहापैकी पाच आमदार शिंदेसोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या जिल्ह्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौऱ्यानंतर लगेच सूषमा अंधारे यांच्या प्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com