Shivsena : रस्त्यावर चारा जाळत शिवसेनेचा चक्काजाम ; पोलिसांनी घेतले ताब्यात..

बराच वेळ शिवसैनिकांनी रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर पोलिसांनी अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ओढत पोलिस व्हॅनमध्ये बसवले. ( Shivsena)
Opposition Leader Ambadas Danve Protest News, Aurangababd
Opposition Leader Ambadas Danve Protest News, AurangababdSarkarnama

औरंगाबाद : महावितरणकडून शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी केली जाणारी सक्ती व पीकविमा कंपनीच्या मनमानी धोरणाविरोधात आज Shivsena शिवसेनेने जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर तालुक्यात आंदोलन करण्यात आले. Marathwada

Opposition Leader Ambadas Danve Protest News, Aurangababd
Marathwada : शिवसेनेचा खासदार पाडणाऱ्या जाधवांना आमदार, खासदार होण्याची इच्छा नाही..

रस्तावर चारा जाळत शिवसैनिकांनी रस्ता रोखून धरला होता. अखेर पोलिसांनी दानवे यांच्यासह अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. राज्यात (Farmers) शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा आणि विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई न मिळण्याचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. (Shivsena) शिंदे-फडणवीस सरकारकडून एकाही शेतकऱ्याची वीज तोडणार नाही, नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळेल असा दावा केला जातोय.

तर विरोधक मात्र सरकारचे हे खोटे आश्वासन असल्याचे म्हणत रस्त्यावर उतरले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत वीजबील सक्ती आणि पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गंगापूर तालुक्यातील इसारवाडी फाटा व अन्य सात ठिकाणी चक्का जाम केला.

यावेळी रस्त्यावर चारा जाळून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार करत घोषणाबाजी देखील करण्यात आली. अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करताच पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घतले.

बराच वेळ शिवसैनिकांनी रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर पोलिसांनी अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ओढत पोलिस व्हॅनमध्ये बसवले आणि त्यांनतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com