Shivsena : भाजपकडून सुपारी घेऊन होणाऱ्या सभेने शिवसेनेचा गड हलणार नाही..

हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते होते, ज्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली. बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. (Shivsena)
Shivsena : भाजपकडून सुपारी घेऊन होणाऱ्या सभेने शिवसेनेचा गड हलणार नाही..
Minister Subhash Desai-Raj ThackearaySarkarnama

औरंगाबाद : मनसेची शहरात होत असलेली सभा ही भाजपकडून सुपारी घेऊन होत आहे. अशा सुपारी सभेने शिवसेनेला (Shivsena) काहीही फरक पडणार नाही, औरंगाबाद हा शिवसेनेचा गड होता आणि तो कायम राहील यात तीळमात्र शंका नसल्याची खोचक टीका राज्याचे उद्योग तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केली.

महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजारोहणानंतर प्रसार माध्यमांनी त्यांना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेबद्दल विचारले. यावर ही भाजपने मनसेला दिलेली सुपारी सभा असल्याचा आरोप देसाई यांनी केला. (Marathwada) राज ठाकरे यांची सायंकाळी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे.

मशिदीवरील भोंग्याचा विषय, हनुमान चालीसा, हिंदुत्व आणि शिवसेनेवर सातत्याने केली जाणारी टीका यामुळे राज ठाकरेंच्या या सभेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र या सभेवर टीका करतांना पैसे देऊन माणसं आणली जात आहेत, राज ठाकरे हे सोंगाड्या आहेत, ही सुपारी सभा आहे असे म्हणत हल्ला चढवला आहे.

Minister Subhash Desai-Raj Thackearay
Shivsena : चहा नाश्ता आणि पाचशे रुपये देऊन मनसेच्या सभेला माणसं ..

प्रसार माध्यमांशी बोलतांना सुभाष देसाई म्हणाले, शिवसेनेला हिंदुत्वावरून प्रश्न विचारणारे पक्ष तेव्हा कुठे होते जेव्हा अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली आणि त्यानंतर बजरंग दल, विश्वहिंदू परिषेदस स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या एकाही पक्षाने याची जबाबदारी स्वाकारली नव्हती. तेव्हा हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकच नेते होते, ज्यांनी बाबरी पाडल्याची जबाबदारी घेतली आणि बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर आपल्याला त्याचा अभिमान असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते.

त्यामुळे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकवू नये. आज जे सभा घेतायेत ते भाजपशी भविष्यात युती करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून सुपारी घेऊनच आजची सभा होत आहे. अशा सुपारी सभेने शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड होता आणि यापुढेही कायम राहील, असा विश्वास देखील देसाई यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.