shivsena : शिंदे-फडणवीस सरकार सहा महिन्यात कोसळेल, लिहून घ्या ; खैरेंचा दावा..

फडणवीस यांनी शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती देऊन पाच वर्ष अपमानास्पद वागणूक दिली होती. आता शिंदे गटाला ते कशी वागणूक देतात हे ही लवकरच समोर येईल. (Chandrakant Khaire)
Devendra Fadanvis News, Maharashtra political news in Marathi, Shivsena News
Devendra Fadanvis News, Maharashtra political news in Marathi, Shivsena NewsSarkarnama

औरंगाबाद : बंडखोर आमदारांचे मुंबईत जे शक्तीप्रदर्शन सुरू आहे ते सगंळ मंत्रीपदासाठीच आहे. पण हे सरकारच घटनाबाह्य पद्धतीने आल्यामुळे आता मंत्रीपदासाठी यांच्यात वाद-विवाद होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची सध्याची देहबोली पाहिली तर त्यांचे सरकारमध्ये किती चालते हे लक्षात येते. भाजपचा या सरकारवर पुर्णपणे कंट्रोल असल्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला १२-१३ मंत्रीपद येतील आता त्याचे वाटप ५० मध्ये करण्याची कसरत शिंदे यांना करावी लागणार आहे. यातून अनेक बंडखोर नाराज होतील आणि हे सरकार सहा महिन्यात कोसळेल लिहून घ्या, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chnadrakant Khaire) यांनी `सरकारनामा`शी बोलतांना केला.(Maharashtra political news in Marathi)

औरंगाबाद पश्चिमचे बंडखोर आमदार संजय शिरसाट, सिल्लोड-सोयगावचे अब्दुल सत्तार हे आज आणि उद्या मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करणार आहेत. (Aurangabad) आज संजय शिरसाट यांचे समर्थक खाजगी वाहनांनी मुंबईकडे रवाना झाले आहेत, तर सत्तार यांचे समर्थक देखील आजच मुंबईकडे कूच करणार आहेत. (Chnadrakant Khaire News in Marathi)

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, शिवसेनेला कुमकूवत करणे, पक्ष फोडणे यासाठी भाजपने केलेली खेळी शिंदेंच्या बंडामुळे तुर्तास यशस्वी झाली असे वाटत असले तरी हे सरकार अल्पकाळाचे ठरेल. आई जंगदबा बरोबर न्याय करत असते, सत्ता आणि मंत्रीपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये येत्या काही दिवसांत काय घडेल हे महाराष्ट्राला दिसेलच.

संजय शिरसाट यांनी ३५ वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईला नेण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याच मतदारसंघातून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी अक्षरशा बीड, नाशिकहून माणसे आणल्याची आमची माहिती आहे. सत्तार देखील कन्नडमधून कार्यकर्ते घेऊन जाणार आहे. शिवसेनेचे जे कोणी पदाधिकारी या बंडखोरांसोबत जातील, त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येईल.

मुंबईतील हे शक्तीप्रदर्शन केवळ मंत्रीपदासाठी सुरू आहे. पण युती सरकारमध्ये भाजपने सगळी महत्वाची खाती आपल्याकडे ठेवून घेतली होती. फडणवीस यांनी शिवसेनेला दुय्यम दर्जाची खाती देऊन पाच वर्ष अपमानास्पद वागणूक दिली होती. आता शिंदे गटाला ते कशी वागणूक देतात हे ही लवकरच समोर येईल. शिवसेना फोडणे हा एकमेव उद्देश भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून साध्य केला आहे.

Devendra Fadanvis News, Maharashtra political news in Marathi, Shivsena News
'मविआ'ला झटका; सरपंच-नगराध्यक्षांच्या निवडीबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय

आता बंडखोरांच्या परतीचे दोर कापले गेले आहेत, शिवाय निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार देखील त्यांच्यावर कायम आहे. त्यामुळे आता त्यांचे काय हाल होतात हे सगळ्या महाराष्ट्राला दिसेल. शिंदे यांच्यासोबत ५० आमदार आहेत, तर भाजपकडे ११६ मग महत्वाची खाती ते शिंदे गटाला देणे शक्यच नाही. दुय्यम खाती देवूनच फडणवीस शिंदे गटाची बोळवण करतील. त्यातून जी नाराजी निर्माण होणार आहे ती हे सरकार कोसळण्याला कारणीभूत ठरेल. सहा महिन्याच्या आत हे सरकार कोसळेल, याचा पुनरुच्चार देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in