Shivsena : शिंदे आणि गट फडणवीसांना संपवायचा आहे..

सत्ताधाऱ्यांनी माझ्या चरित्र बद्दल आरोप करण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी विरोधकांच्या ट्रॅपमध्ये मी अडकणारी नसून मी माझे कार्य असेच चालू ठेवणार. (Shivsena)
Shivsena Leader Sushma Andhare News, Aurangabad
Shivsena Leader Sushma Andhare News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांना जरी मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरीही त्यांना केवळ पद मिळाले आहे. खरी सत्ता ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्याकडेच आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना ठरवून अडचणीत आणण्याचा डाव भाजपचा असून फडणवीस यांच्याकडून शिंदे यांना संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी केला.

Shivsena Leader Sushma Andhare News, Aurangabad
Sharad Pawar : विद्यापीठ नामांतराच्या संघर्षाची किंमत मलाही मोजावी लागली..

शनिवारी (ता.१९) सुषमा अंधारे या `काॅफी विथ सकाळ` कार्यक्रमात आल्या असता त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडीबद्दल आपली मते मांडत सत्ताधाऱ्यांवर टीकेची जोड उठवली. (Shivsena) शिंदे गटातील नेत्यांना पदे मिळाली असली तरी सत्ता मात्र मिळालेली नाही, सर्व महत्त्वाची पद फडणवीस यांच्याकडे आहेत. आणि दुसरीकडे जनतेचा रोष असणारी कृषी, उद्योगमंत्री ही पद शिंदे (Eknath Shinde) गटाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहेत.

अशा पद्धतीने शिंदे व त्यांच्या नेत्यांचा ठरवून कार्यक्रम करण्यात येत असून त्यांचे परतीचे दोर कापले जात आहेत. तसेच ज्या राज्यात भाजपसोबत स्थानिक पक्षांनी युती केली त्या पक्षाला भाजपने संपवले आहे. याच पद्धतीने शिवसेनेसोबत भाजपने केले आहे. बच्चू कडू यांच्यासोबतही असेच कट कारस्थान केले जात असल्याचा दावा देखील अंधारे यांनी केला. शिंदे गट आणि त्यांच्यासोबत आलेल्या छोट्या पक्षांच्या नेत्यांची चलबिचल वाढली असून हे सरकार कोणत्याही क्षणी पडेल, असे भाकीतही अंधारे यांनी केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यात प्रबोधन यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेंचा विचार सामान्य व्यक्तीपर्यत पोचविण्यात येत आहे. तसेच सध्या होत असलेल्या द्वेषाचे राजकारण, भारतीय संविधानाची चौकट बदलण्याच्या विरोधात आवाज उठवत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या पंधरा वर्षापासून मी फुले, शाहु, आंबेडकर चळवळीत काम करत आहे. शिवसेना पक्षात आल्यानंतर मी विरोधकांवर टीकेची झोड सुरू केली आहे.

यावर मला भय दाखवण्यात आले. तसेच माझ्या संदर्भात भ्रम निर्माण करण्यात आला. यावरही न थांबता सत्ताधाऱ्यांनी माझ्या चरित्र बद्दल आरोप करण्यास सुरवात केली आहे. असे असले तरी विरोधकांच्या ट्रॅपमध्ये मी अडकणारी नसून मी माझे कार्य असेच चालू ठेवणार असल्याचा निर्धार देखील अंधारे यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांना विदर्भात समांतर शक्ती नको म्हणून नव्या विचाराने उभे राहत असलेल्या बच्चू कडू यांच्या पक्षाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येत आहे. अंकुर फुटण्याआधीच नव्या पक्षाला संपविण्यात येत असल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला. शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये भाजप आपल्या उमेदवारांची ताकद वाढवत असल्याचेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com