Shivsena : शहाजीबापू माझ्यासाठी खुर्चीचं राहू द्या, तुम्हाला मी मातोश्रीकडून मोठी खुर्ची मिळवून देतो..

शहाजीबापू पाटील यांचे काय ते झाडी, काय ते डोंगर याची चर्चा आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. किती दिवस तेच सांगून लोकांचे मनोरंजन करणार. (Chandrakant Khaire)
Chadrakant Khaire-Mla Sahajibapu Patil News, Aurangabad
Chadrakant Khaire-Mla Sahajibapu Patil News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पैठण येथील सभेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. या सभेत काय झाडी, काय डोंगर फेम आमदार शहाजीबापू पाटील (Aurangabad) यांचे भाषण चांगलेच गाजले. (Shivsena) विशेषत: भुमरे तुमची एक मोठी चूक झाली, कोपऱ्यात आणखी दोन खुर्च्या तुम्ही खैरे आणि दानवेंसाठी ठेवायला हव्या होत्या, म्हणजे त्यांना भुमरे मामांच्या सभेला किती गर्दी झाली हे कळाले असते असा टोला लगावला होता.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी यावर शहाजीबापू पाटील यांनाच मी तुम्हाला मोठी खुर्ची मिळवून देतो, असे म्हणत परत शिवसेनेत येण्याचे आवाहन केले. पैठणची सभा, त्याला जमलेली गर्दी या सर्व विषयावर खैरे यांनी आपली भू्मिका स्पष्ट केली.

ती करत असतांनाच खैरे म्हणाले, शहाजीबापू पाटील यांचे काय ते झाडी, काय ते डोंगर याची चर्चा आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. किती दिवस तेच सांगून लोकांचे मनोरंजन करणार. शेवटी कामे देखील करावी लागतील.

मला आणि अंबादास दानवेंना दोन खुर्च्या सभेच्या ठिकाणी कोपऱ्या ठेवायला पाहिजे होत्या, असं ते म्हणाले. पण हरकत नाही मी त्यांना चांगल ओळखतो. ते हजार-पाचशे मतांनीच निवडून आलेले आहेत. तेव्हा मला खुर्ची देण्यापेक्षा त्यांनी इकडे यावे, मी त्यांना मातोश्रीवर घेऊन जातो आणि मोठी खुर्ची देतो, असा टोला खैरे यांनी लगावला.

Chadrakant Khaire-Mla Sahajibapu Patil News, Aurangabad
सरकार कोसळल्यानंतर शरद पवार प्रथमच घेणार महाविकास आघाडीची बैठक

मुख्यमंत्र्यांची सभा फसली, त्यांच्या भाषणात दम नव्हता. खुर्च्या टाकून मैदान भरवण्यात आले होते, २५ टक्के लोक देखील मतदारसंघातील नव्हते, असा दावा देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in