Hingoli: शिवसेना आक्रमक; संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

Santosh Bangar |Hingoli| विधानसभेत बहुतमताच्या दिवशी संतोष बांगर हेदेखील बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाले.
Santosh Bangar News in Marathi, Hingoli Latest Marathi News
Santosh Bangar News in Marathi, Hingoli Latest Marathi News

हिंगोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना मोठा धक्का दिला आहे. संतोष बांगर यांची शिवसेना (Shivsena) हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षा विरोधात कार्यवाही केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.(Hingoli Latest Marathi News)

विधानसभेत बहुतमताच्या दिवशी संतोष बांगर हेदेखील बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार आणि जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. पण त्यांच्या बंडखोरीनंतर आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. (Santosh Bangar News in Marathi)

Santosh Bangar News in Marathi, Hingoli Latest Marathi News
संतोष बांगर निघाले सगळ्यांचेच गुरु; बंडखोरी करुनही आमदारकी वाचणार

2009 पासून संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदावर होते. पण बांगर यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यासोबत बांगर यांच्या तोडीस तोड देणारा जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंकडून जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करण्यात येत आहे. बहुमत चाचणीच्या दिवसापर्यंत संतोष बांगर ठाकरेंसोबत होते. पण बहुमत चाचणीच्या दिवशी बांगर अचानक पलटले आणि त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होतं.

धक्कादायक म्हणजे, एकनाथ शिंदेंनी बंड केले आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, तेव्हा हेच संतोष बांगर त्यांना परत येण्याची मागणी करत ढसाढसा रडले होते. ''अख्ख्या मराठवाड्यातले आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक आहे, म्हणत ढसाढसा रडलेही. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर 24 तासांत हे शिंदेगटात सामील झाल्याने शिवसेनेवलाही मोठा धक्का बसला होता.

संतोष बांगर यांच्या बंडखोरीनंतर हिंगोलीचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी हिंगोली शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली. या बैठकीत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शिवसैनिकांशी संवादही साधला. शिवसेनेने ज्यांना दिलं ते सोडून गेले, पण ज्यांनी आपल्याला दिलं ते आजही सोबत आहेत त्यामुळे आता आपल्याला लढायचं आहे, असे सांगत लवकरच मी सर्वांना भेटायला येणार आहे, असं उध्दव ठाकरेंनी शिवसैनिकांना आश्वासन दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com