Shivsena : औरंगाबादमध्ये राजकीय नाट्य : शिंदे-ठाकरे गटाचे नेते बसले शेजारी-शेजारी, पुढे असं काही घडलं की...

Shivsena : शेजारी बसून त्यांनी एकमेकांशी एक चकार शब्द..
chandrakant Khaire
chandrakant KhaireSarkarnama

Shivsena : यंदाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day) औरंगाबादेत राजकीय नाट्याचा ठरला. शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकाच कार्यक्रमात एकत्र आलेले दिसले. औरंगाबादमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात, दोन्ही गटांचे नेते शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच मंचावर शेजारी बसलेले दिसले.

chandrakant Khaire
Nana Patole News; काँग्रेसची घाई; अस्तित्वात नसलेली कार्यकारणी बरखास्त?

शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना एकाच आसनावर शेजारी बसलेले पाहून अनेकजण अचंबित झाले. एकाच सोफ्यावर बसल्यानंतर दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही. तोंडातून चकार शब्दही काढला नाही. पालकमंत्री असलेले संदीपान भुमरे यांनी कार्यक्रमाच्या संकेताप्रमाणे, भाषण करून उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा देण्यासाठी आले, पण यावेळी चंद्रकांत खैरे शुभेच्छा न देताच तिथून निघून गेले. मात्र यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रसंगावधान दाखवत परिस्थिती सांभाळून घेतली. दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आजही प्रचंड वितुष्ट असल्याचे दिसून येते.

chandrakant Khaire
Congress On Bjp :‘भाजपच्या माजी मंत्र्याची प्रतिमत सहा हजार वाटण्याची तयारी’ : काँग्रेसची नड्डांसह चौघांविरोधात पोलिसांत तक्रार

दरम्यान, मंत्री महोदय तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले, तरी का उठून गेलात असा प्रश्न खैरेंना विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना खैरे म्हणाले,"हे मंत्री आणि सरकार घटनाबाह्य आहे." खैरेंच्या या विधानावर संदिपान भुमरे प्रत्युत्तर देत म्हणाले, "त्यांनीअपमान केला आहे. मुळात यांना घटनाबाह्य पालकमंत्री असं म्हणण्याचे अधिकार कुणी दिलेत? मी घटनाबाह्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी हे सुप्रीम कोर्ट आहेत का? खैरे सतत काहीही बोलत राहतात. कारण जे काही चाललंय, ते खैरै यांना सहन होत नाही, त्यांना पाहावलं जात नाही, म्हणून ते असलं काही बोलत राहतात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com