Shivsena : सणासुदीला पण लोक इज्जत काढतात ; दानवेंचा शिंदे गटाला टोला

दिवाळीनिमित्त काढलेल्या एका रांगोळीचा फोटो शेअर करत दानवेंनी शिंदे गटाची पार इज्जतच काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
Opposition Leader Ambadas Danve News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : राज्यातील सत्तांतराच्या वेळी घडलेल्या नाट्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. संधी मिळेल तेव्हा सर्वसामान्य नागरिक व शिवसैनिक शिंदे गटाला टोला लागवण्याची संधी सोडत नाहीत. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई या प्रवासाचे रंजक किस्से अजूनही सांगितले जातात. गणेशोत्सव, नवरात्रात देखील ५० खोके एकदम ओके अशा घोषणांनी शिवसैनिकांकडून शिंदे गटाला डिवचण्यात आले होते.

Opposition Leader Ambadas Danve News, Aurangabad
दिवाळीनंतर राज्यात प्रशासकीय फेरबदल ; शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय...

हाच ट्रेंड दिवाळीत देखील बघायला मिळतोय. एका रांगोळीचे चित्र पोस्ट करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे. (Shivsena) या रांगोळीत सुरत, गुवाहाटी, गोवा आणि पन्नास खोके एकदम ओकेचा उल्लेख करण्यात आला आहे. (Aurangabad) यावरून लोक अजूनही इज्जत काढतात, अशा शब्दात अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

आनंदाचा शिधा, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शेतकऱ्याला एक छदमाही मदत न करणारे शिंदे सरकार यांच्यावर शिवसेना अक्षरशा तुटून पडली आहे. त्यात अंबादास दानवे तर आघाडीवरच आहेत.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी असल्यामुळे संधी मिळेल तेव्हा सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करत अंबादास दानवे शिंदे गटाला टोमणे मारत असतात.आता दिवाळीनिमित्त काढलेल्या एका रांगोळीचा फोटो शेअर करत दानवेंनी शिंदे गटाची पार इज्जतच काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in