Shivsena : खोतकर-दानवेंच्या ऍडजेस्टमेंटला लोक कंटाळलेत ; आता खासदार, आमदार आमचाच..

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घराघरात, भावाभावात, नातेवाईकांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. फोडाफोडीचे राजकारण याआधी राज्यात कधी झाले नव्हते. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire News, Jalna
Chandrakant Khaire News, JalnaSarkarnama

जालना : कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून पाहणारे जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यात खालून ऍडजेस्टमेंट होती. त्याला आता जालनेकर कंटाळले आहेत, त्यामुळे येणारा जालन्याचा खासदार आणि आमदार आमचाच होणार, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

Chandrakant Khaire News, Jalna
Marathwada : नांदेडातील `भारत जोडो` ने अशोक चव्हाणांचे वजन वाढले..

` मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, या पायी दिंडीचा शुभारंभ चंद्रकांत खैरे, (Chandrakant Khiare) उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना खैरे यांनी जालन्याचा खासदार आणि आमदार देखील (Shivsena) शिवसेनेचाच होईल असा दावा केला. चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी सेटिंगचा आरोप देखील केला.

खैरे म्हणाले, रावसाहेब दानवे यांना चकवा का म्हणतात? हे जालनेकरांना चांगलेच माहित आहे. रावसाहेब दानवे आणि खोतकर हे कितीही भांडणाचे नाटक करत असले तरी त्यांचे सेटिंगचे राजकारण चालते. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे त्यांच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. त्यामुळे ते खालून सेंटिंग करतात, पण जालन्याचे लोक या ऍडजेस्टमेंटच्या राजकारणाला कंटाळले आहेत.

मातोश्रीवर नुकतीच जालना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. तेव्हा उद्धव साहेबांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जालन्याचा खासदार आणि आमदार शिवसेनेचाच असेल असा ठाम विश्वास व्यक्त करत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. गद्दारांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड राग आहे, तो निवडणुकीतून समोर येईल.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घराघरात, भावाभावात, नातेवाईकांमध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत. फोडाफोडीचे राजकारण याआधी राज्यात कधी झाले नव्हते. आमच्या गजनान किर्तीकरांना या वयात पक्ष सोडायला लावून मुख्यमंत्र्यांनी मुलगा आणि वडिल यांच्यात भांडण लावण्याचे काम केले असल्याचा आरोप देखील खैरे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com