Shivsena : ओमराजे म्हणतात, भाजपला मैदानात तर येवू द्या, आत्ताच कशाला अंगावर घेवू..

Marathwada : १९९६ ला सर्वप्रथम शिवसेनेला या मतदारसंघात शिवाजी कांबळे यांच्या रुपाने पहिला खासदार मिळाला होता.
Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad
Mp.Omraje Nimbalkar News, OsmanabadSarkarnama

Osmanabad Politics : भाजपने राज्यात लोकसभेसाठी मिशन ४५ अन् विधानसभेसाठी दोनशे जांगाचे लक्ष्य ठेवल्यापासून याची राजकीय वर्तुळात जोदार चर्चा सुरू आहे. त्यातच (Bjp) भाजपने राज्यातील बहुतांश लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा विचार केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू आहे. जिथे सध्या शिंदे गटाचे खासदार आहे, त्या लोकसभा मतदारसंघांवर देखील भाजपने दावा ठोकला आहे. परंतु या विषयावर काही बोलायचे नाही, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांना दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील सध्या या विषयावर फारसे भाष्य करायचे नाही, अशीच भूमिका घेतल्याचे दिसून येते.

Mp.Omraje Nimbalkar News, Osmanabad
Abdul Sattar : अधिवेशनात राजीनाम्याची मागणी करणारे दानवे सत्तारांच्या निशाण्यावर...

भाजपने दावा सांगितलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी मराठवाड्यातील उस्मानाबाद हा एक आहे. इथे उद्धवसेनेचे ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे विद्यमान खासदार आहेत. विशेष म्हणजे (Shivsena) शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी शिंदेसेनेची वाट धरली असली तरी ओमराजे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. भाजपने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला, त्यांचे कितपत आव्हान वाटते, या संदर्भात विचारले असता, ओमराजे म्हणाले, कुणाला कितीही दावा सांगू द्या, लोक काम करणाऱ्या माणसाला निवडून देत असतात.

मी आमदार आणि आता खासदार असतांना मतदारसंघातील लोकांसाठी काय केले? हे त्यांना माहित आहे. त्यामुळे माझं निवडणुकीत काय करायचं ते त्यांच्याच हातात असणार आहे. अजून निवडणूकीला एक वर्ष बाकी आहे, शिवाय भाजपने दावा सांगितला असला तरी अद्याप ते मैदानातच उतरलेले नाहीत, तर मी त्यांना अंगावर कशाला घेवू. त्यांना आधी मैदानात येवू द्या, मग बघू काय ते? आणि कोणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवणार आहे, त्यामुळे भाजप लढवणार की आणखी कोण? याचा विचार आताच कशाल करू, असेही ओमराजे म्हणाले.

उस्मानाबाद हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. १९५२ ते ९१ पर्यंत इथे काॅंग्रेचे एकहाती वर्चस्व होते. सातत्याने ही जागा काॅंग्रेसने जिंकली होती. १९९६ ला सर्वप्रथम शिवसेनेला या मतदारसंघात शिवाजी कांबळे यांच्या रुपाने पहिला खासदार मिळाला होता. पण दोन वर्षांनीच लागलेल्या लोकसभा निवडणुकीत काॅंग्रेने ही जागा पुन्हा खेचून आणली होती. त्यानंतर ९९ ते २०१९ दरम्यान ९८ चा राष्ट्रवादीच्य पद्मसिंह पाटलाचा अपवाद वगळता शिवसेनेने इथे सातत्याने विजय मिळवला.

कल्पना नरहिरे, प्रा. रविंद्र गायकवाड अन् ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणून निवडून गेले. २०१९ मध्ये ओमराजे निंबाळकर १ लाख २७ हजार मतांनी विजयी झाले होते, तेव्हा शिवसेना-भाजप युती होती. भाजपच्या मदतीने आणि मोदींचा करिश्मा याचा त्यांच्या विजयात मोठा वाटा होता, असा दावा सात्याने भाजपकडून केला जातोय. आता भाजप स्वतंत्र लढणार असल्याने ओमराजे यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com