Shivsena News : उद्धव ठाकरेंसाठीचा नवस फेडताना मृत पावलेल्या शिवसैनिकाचे घर शिंदेंनी उभारले..

Eknath Shinde : रुईकर यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील एकनाथ शिंदे यांनी घेतली होती.
Beed Shivsena News
Beed Shivsena NewsSarkarnama

Marathwada : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना बरेच दिवस विश्रांती घ्यावी लागली. याच काळात बीड येथील शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी व्हावी, असा नवस केला. ठाकरे ठणठणीत बरे झाल्यानंतर हा नवस फेडण्यासाठी रुईकर आपल्या काही सहकाऱ्यांसह बीड ते तिरुपती पायी निघाले होते. परंतु कर्नाटक राज्यात पोहोचताच वाटेत रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Beed Shivsena News
BRS Rally News : बीआरएसने दाखवलेले स्वप्न सत्यात उतरेल का ?

या घटनेने शिवसेनेला मोठा धक्का बसला, मुंबईतून काही नेते, पदाधिकाऱ्यांना (Beed)बीडमध्ये पाठवून उद्धव ठाकरेंनी रुईकर कुटुंबीयांची चौकशी करत तात्पुरती मदतही केली. परंतु त्यानंतर रुईकर कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. (Shivsena) दरम्यान राज्यात घडलेल्या घडामोडी, झालेले सत्तांतर आणि मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची काळजी वाहिली.

सुमंत रुईकर हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवसेनेत कार्यरत होते. बीड नगरपालिकेत काही काळ नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेल्या रुईकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कुटुंब संकटात सापडले. याची जाणीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठेवली. रुईकर यांच्या कुटुंबीयांची आपल्या खाजगी सचिवामार्फत चौकशी करून त्यांनी रुईकर यांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले.

केवळ आश्वासन देऊन ते थांबले नाहीत तर याची जबाबदारी त्यांनी आपले खाजगी सचिव बाजीराव चव्हाण यांच्यावर सोपवली. दीड दोन वर्षात पदरचे २५ लाख रुपये खर्चून एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचे घर बांधण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. शिंदे यांच्या या कृतीमुळे ते खऱ्या शिवसैनिकाची किती काळजी घेतात हे यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

रुईकर यांच्या निधनानंतर अडचणीत आलेल्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी आधार दिल्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करत रुईकर कुटुंबाने आभार मानले आहेत. दरम्यानच्या काळात रुईकर यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. बीडमध्ये रुईकर कुटुंबीयांचे घर उभे राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com