Shivsena News : खैरे-शिरसाटांचे सूर जुळतायेत का ?

Khaire-Shirsat : आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे हे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, Aurangabad
Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, AurangabadSarkarnama

Marathwada Politics : प्रजासत्ताकदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात अपेक्षेप्रमाणे शिंदे आणि ठाकरे गटात मानपान नाट्य रंगले. पालकमंत्री म्हणून संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी ध्वजारोहण केले आणि व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांना अभिवादन केले. अर्थात शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यास सगळ्याच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थितीत होते.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency: जयदत्त क्षीरसागरांचं ठरलं कोणाला पाठिंबा द्यायचा

भुमरे सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी पुढे सरसावले पण खैरेंनी त्यांचे अभिवादन न स्वीकारता मार्ग बदलला आणि ते निघून गेले. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मात्र खैरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर मोठे नेते कसेही वागले तरी त्यांचा आदर करावाच लागतो, असे म्हणत शिरसाटांनी (Chandrakant Khiare) खैरेंचे ज्येष्ठत्व मान्य केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे हे पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. वीस वर्ष खासदार, दोनवेळा आमदार आणि राज्यात मंत्री राहिलेल्या खैरेंचा जनसंपर्क शहरासह जिल्ह्यात दांडगा आहे. येणाऱ्या विधानसभा निडणुकीत खैरेंची मदत व्हावी, यासाठीच शिरसाट त्यांचीशी जुळवू पाहत आहेत का? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे.

विशेष म्हणजे प्रजासत्ताकदिनाच्या सोहळ्यात खैरे आणि शिरसाट हे दोघे मांडीला मांडी लावून शेजारीच बसले होते. दोघे एकमेकांशी फारसे बोलले नाही, पण माध्यमांशी बोलतांना मात्र त्यांनी संयम दाखवत मान राखला. शिरसाटांना शुभेच्छा देणाऱ्या खैरेंनी भुमरे हे घटनाबाह्य सरकारचे मंत्री आहेत, म्हणत त्यांचे अभिवादन नाकारले.

त्यामुळे भुमरेंशी फटकून वागणाऱ्या खैरेंनी शिरसाटांशी मात्र सूर जुळवून घेतले की काय? अशी चर्चा होत आहे. शिंदे बंडात आघाडीवर राहून देखील शिरसाट मंत्रीपदापासून वंचित राहिले. तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खैरे अडगळीत पडले होते. शिंदे बडांमुळे आता कुठे त्यांना अच्छे दिन आले आहेत.

Mla Sanjay Shirsat-Chandrakant Khaire News, Aurangabad
Santosh Bangar News : व्हिडिओ व्हायरल झालेल्या 'त्या' प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

शिवाय लोकसभेला एक संधी खैरेंना देण्याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत एकमेकांची गरज म्हणून हे पुर्वी ३०-३५ वर्ष एकाच पक्षात काम केलेले नेते, सध्या वेगळ्या नावेत असले तरी दोघांचीही नौका पार लागावी यासाठी जुळवून घेण्याच्या बेतात दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com