Shivsena : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी गैरफायदा घेत आहे...

महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीचे वाटप समान पद्धतीने झाले पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतला. (Shivsena)
Shivsena Mp Shrirang Barne
Shivsena Mp Shrirang BarneSarkarnama

जालना : राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कोणत्या पदाधिकाऱ्याने मागणी केली आणि त्याच्याकडे काय पद आहे? मी त्यांना ओळखत नाही. (Shivsena) परंतु निवडणुकीला दोन वर्षा पेक्षा जास्त कालावधी असताना हा कार्यकर्ता मागणी करतोय की त्याला कुणी मागणी करायला लावून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.(Ncp)

मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवारांचे पुत्र पार्थ यांच्यासाठी सोडवू पाहत आहे. तशी मागणी राष्ट्रवादीकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारणे यांनी हा आरोप केला. शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने बारणे जालना दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी प्रसार माध्यमांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता बारणे म्हणाले, महाविकास आघाडी म्हणायचे आणि दुसऱ्या पक्षाविषयी दुजाभाव दाखवायचा हे कुठं तरी थांबलं पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये काय परिस्थिती आहे हे शिवसैनिकांना माहीत आहे, परंतु ज्या कुणी मावळच्या जागे संदर्भात मागणी केली त्या मागणीला कुणी तरी पाठीमागून साथ देत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादीकडून गैरफायदा घेतला जात आहे. अर्थखाते असलेल्या राष्ट्रवादीकडून निधी वाटपात देखील शिवसेनेच्या बाबतीत दुजाभाव केला जात असल्याचा आरोप बारणे यांनी यावेळी केला.

Shivsena Mp Shrirang Barne
बारणे म्हणाले, राष्ट्रवादीकडून निधीवाटपात दुजाभाव; राऊत म्हणतात सर्वांना समान न्याय..

महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीचे वाटप समान पद्धतीने झाले पाहिजे पण तसे होतांना दिसत नाही. सर्वाधिक निधी राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून घेतला आहे आणि शिवसेना-काॅंग्रेसला कमी निधी दिला, असेही बारणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com