Shivsena : शिंदेंच्या बंडानंतरही शिवसेना-राष्ट्रवादीची मैत्री पक्कीच ; दानवे थेट कार्यालयात..

दानवे यांनी या भेटीचा फोटो ट्विट करत माहिती दिलीआहे. आज पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. (Opposition Leader Ambadas Danve)
Opposition Leader Ambadas Danve In Ncp Office News.
Opposition Leader Ambadas Danve In Ncp Office News.Sarkarnama

औरंगाबाद : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतांना शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड पुकारत हादरा दिला. त्यानंतर अपक्ष आणि काही छोट्या पक्षांनी देखील शिंदे यांची री ओढत त्यांना बळ दिले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडीला सत्ता गमवावी लागली. परंतु यानंतरही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील मैत्री कायम आहे.

Opposition Leader Ambadas Danve In Ncp Office News.
Shivsena : `मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, पायी दिंडी जालना मतदारसंघात..

उलट शिंदेच्या बंडानंतर ती अधिकच घट्ट झाल्याचे चित्र राज्यात दिसू लागले आहे. (Shivsena) शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पुणे दौऱ्यात वेळात वेळ काढून (Ncp) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जिल्हा संपर्क कार्यालयाला भेट देत तिथे काहीवेळ घालवला.

या भेटीचे छायाचित्र दानवे यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट करत महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीच्या मैत्रीचा धागा किती पक्का आहे, हेच यातून दाखवण्याचा प्रयत्न केला असावा. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी सातत्याने राष्ट्रवादीवर आरोप केले होते. निधी वाटप, विकासकामांना मंजुरी देतांना राष्ट्रवादीकडून अन्याय केला जातोय. शिवसेनेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारा विद्यमान आमदारापेक्षा जास्त निधी दिला जातो, राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघाली आहे, असे अनेक आरोप त्यावेळी करण्यात आले होते.

त्यानंतर राज्यात काय घडले हे वेगळे सांगणे नको. परंतु मुख्यमंत्रीपद आणि सत्ता गेली तरी शिवसेना राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे इतर नेते, लोकप्रतिनिधी आणि आमदार देखील आपापल्या पातळीवर राष्ट्रवादीशी जुळवून घेतांना दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या पुणे दौऱ्यात थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या संपर्क कार्यालयाला भेट देत तेच अधोरेखित केले आहे.

दानवे यांनी या भेटीचा फोटो ट्विट करत माहिती दिलीआहे. आज पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप व शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे उपस्थित होते, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या भेटीची आणि फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in