ShivSena News : पंकजा मुंडेंचं पक्षात स्वागतच, ; शिंदेंचं मोठं विधान

Pankaja Mundhe News : त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू.
Pankaja Munde News in Marathi, Beed News
Pankaja Munde News in Marathi, Beed NewsSarkarnama

ShivSena News : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) या नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यापूर्वीही त्या नाराज असल्याची भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली होत्या. (ShivSena Latest News)

पंकजा मुंडेंच्या नाराज असल्याची भावना लक्षात घेऊन त्यांना यापूर्वी एमआयएममध्ये सहभागी होण्याचे आवाहन एमआयएमने दिले होते. त्यानंतर "शिवसेनेत त्यांचे स्वागत,' असल्याचे एका आमदाराने म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी भाष्य केलं आहे. पाथर्डी तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी हे विधान केलं आहे.

"पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा पक्ष खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांचं मत आणि त्यांच्या क्रिया-प्रतिक्रियेशी माझा काहीही संबंध नाही. त्यांच्यावर अन्याय होतोय, हे आम्हाला दिसतयं. पण त्या आणि त्यांच्या पक्षातील हा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामध्ये मी काहीही बोलणार नाही. पण त्यांच्या कर्तुत्वाला आम्ही नेहमीच सलाम करत राहू. पंकजा मुंडे यांचं शिवसेना पक्षात स्वागत आहे,” असे शिंदे म्हणाले.

पंकजा मुंडेंना त्यांच्या पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवरून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रासपाचं वेगळं समीकरण दिसणार का असा प्रश्न महादेव जानकरांना पत्रकारांनी विचारला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (काल) पंढरपूरमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या मेळाव्याला आले असताना माध्यमांशी बोलत होते.

Pankaja Munde News in Marathi, Beed News
Prakash Ambedkar News : काँग्रेस-राष्ट्रवादीनं आमचा खिमा केला, असं आंबेडकर का म्हणाले..

जानकर म्हणाले, “पंकजा मुंडे माझ्या बहिण जरी असल्या, तरी त्या भाजपाच्या सहसचिव आहेत. त्यामुळे त्या भाजपातच राहणार आहेत. मी नाराज असल्याचा काहीच प्रश्न नाही. माझ्या चौकात, पश्चिम महाराष्ट्रात माझे किती आमदार आहेत? पंढरपूरला किती नगरसेवक आहेत? किती जिल्हा परिषद सदस्य आहेत? त्यामुळे मी नाराज नाही.”

Pankaja Munde News in Marathi, Beed News
Amit Deshmukh : "लातुरात देशमुख वाडा.." ; भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चेवर देशमुखांचे स्पष्टीकरण

जानकर म्हणाले,"“प्रत्येक पक्षाची एक थिअरी असते. माझ्या पक्षात कोणाला कुठे हे मी ठरवणार, तसंच भाजपाचं आहे. त्यामुळे बहिण असली तरी पंकजा मुंडेंचा पक्ष वेगळा आहे. त्यांना कोणतं पद द्यायचं हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर बोलणं योग्य नाही,”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in