नवनीत राणा स्वतःची टिमकी वाजवत नौटंकी करतात ; शिवसेनेच्या कायदेंचा घणाघात

राणा या स्वतः सेलिब्रिटी असून त्या दिवसभर राज्य सरकारवर टीका करून स्वतःची टिमकी वाजवून नौटंकी करत असतात.
navneet rana, manisha kayande
navneet rana, manisha kayandesarkarnama

जालना : शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्यावर घणाघात केला आहे. नवनीत राणा समाजकारण कमी अन् स्वतःची टिमकी वाजवून नौटंकी करीत असतात, अशी टीका कायंदे (manisha kayande) यांनी राणा यांच्यावर केली आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

मनिषा कायंदे म्हणाल्या, ''शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील इमारतीवर लावण्यात आलेला दंड माफ करण्याच्या निर्णय हा कुण्या एका पक्षाने किंवा व्यक्तीने घेतलेला निर्णय नसून राज्यमंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय आहे. भाजपने त्याबाबात राज्यपालांकडे तक्रार केली आहे. ऊठसूट राज्यपालांकडे जायची भाजपची सवय झाली आहे,''

''अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या स्वतः सेलिब्रिटी असून त्या दिवसभर राज्य सरकारवर टीका करून स्वतःची टिमकी वाजवून नौटंकी करत असतात. नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्याबद्दल एका महिलेने त्यांच्याकडे तक्रार केली. मग ती तक्रार राणा यांनी का गांभीर्याने घेतली नाही,'' असा सवाल कायंदे यांनी उपस्थित केला आहे.

navneet rana, manisha kayande
विरोधकांना धोबीपछाड देणाऱ्या रोहित पाटलांना 'राष्ट्रवादी' देणार रिटर्न गिफ्ट

''औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यास एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. यावर बोलताना कायंदे म्हणाल्या, ''महाराणा प्रताप यांचा नाही तर मग काय औरंगजेबचा पुतळा उभारायचा का? असा सवाल उपस्थित केला.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांच्या ठाण्यातील इमारतीबाबात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेतली. सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणावरुन त्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

navneet rana, manisha kayande
दोन वर्षात एकदाही मंत्रालयात आले नाहीत, तरीही ठाकरे टॉपच्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये?

''आमदार प्रताप सरनाईक यांना फायदा होण्यासाठी घेतलेला निर्णय आहे, की ज्यामध्ये वित्त विभागाने सगळे निगेटिव्ह रिपोर्ट लिहिले आहेत. तरी एका व्यक्तीला फायदा होण्यासाठी घेतलेला जो निर्णय आहे, ते मंत्री होताना जी शपथ घेतलेली असते त्याचा भंग करणारा आहे. नऊ मजली इमारत अधिकृत आणि चार मजले अनधिकृत अशा इमारतीवर बसलेला ४ कोटी ३० लाख हा दंड आणि व्याज मंत्रीमंडळ बैठकीत माफ करण्यात आला. ही अत्यंत बेकायदेशीर गोष्ट आहे आणि घटनेच्याविरोधी आहे,'' असे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com