'औरंगजेबाच्या कबरीवर माथे टेकवणाऱ्यांच्या सात पिढ्या नरकात जातील'
Minister Subhash Desai, Aurangabad NewsSarkarnama

'औरंगजेबाच्या कबरीवर माथे टेकवणाऱ्यांच्या सात पिढ्या नरकात जातील'

हिंदुत्व हे शिवसेनेच्या नसानसात भरलेले असून हृदयात राम आणि हाताला काम ही आमची भूमिका असल्याचेही देसाई म्हणाले.

औरंगाबाद : ज्यांनी इथे येऊन औरंगजेबच्या (Aurangzeb) कबरीवर माथा टेकवला त्यांच्या सात पिढ्या नरकात जातील, असा श्राप येथील स्वाभिमानी जनता त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी एमआयएमला (MIM) सुनावले. (Subhash Desai Aurangabad Latest Marathi News)

शिवसेनेच्या (Shivsena) मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शंभुराजे महोत्सवात देसाई बोलत होते. काल एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या हस्ते ओवेसी स्कूल ऑफ एक्सलन्सच्या महाराष्ट्रातील पहिल्या शाखेची पायाभरणी करण्यात आली.

 Minister Subhash Desai, Aurangabad News
एकनाथ शिंदेनी घेतला ओवेसींचा समाचार; म्हणाले...

तत्पूर्वी अकबरुद्दीन ओवेसी यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह शहरातील विविध दर्गा व खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले, यावरून शिवसेना विरुद्ध एमआयएम असा वाद निर्माण झाला आहे.

या वादावर आज देसाई यांनी आपले मत व्यक्त केले. शंभुराजे महोत्सवात बोलताना देसाई म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्याच्या सात पिढ्या नरकात जातील असा, श्राप येथील जनता एमआयएमला दिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व हे शिवसेनेच्या नसानसात भरलेले असून हृदयात राम आणि हाताला काम ही आमची भूमिका असल्याचेही देसाई म्हणाले.

 Minister Subhash Desai, Aurangabad News
खरा हिंदू जननायक कोण, याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लागणार..

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेटाने विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. उद्या मुंबईत होणाऱ्या त्यांच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेतून ते विरोधकांचा समाचार घेतीलच पण हिंदुत्ववादी जनतेने देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

औरंगजेबाच्या कुठल्याही खुणा या शहरात असू नयेत ही भूमिका घेऊनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचे नाव संभाजीनगर केले आहे. तांत्रिक बाबींमुळे ते अडकले असले तरी औरंगाबाद हे नाव इथल्या हिंदुत्ववादी जनतेला कदापिही मान्य नाही. म्हणूनच ते या शहराचा उल्लेख कायम संभाजीनगर करत आले आहेत, असेही सुभाष देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.