Shivsena : खैरे म्हणाले गद्दारांची हकालपट्टी होणार अन् युवासेनेच्या जंजाळची उचलबांगडी..

जंजाळ हे महापालिकेत उपमहापौर राहिलेले आहेत. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. (Chandrakant Khiare)
Shivsena Leader Chandrakant Khiare-Rajendra Janjal News
Shivsena Leader Chandrakant Khiare-Rajendra Janjal NewsSarkarnama

औरंगाबाद : शिंदे गटासोबत गेलेले आमदार संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शक्तीप्रदर्शनात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी, माजी नगरसेवक, युवासनेचे पदाधिकारी यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काल दिला होता. त्यानंतर लगेच संजय शिरसाट यांच्या मुंबईतील मेळाव्याला हजर असलेले युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

संजय शिरसाट यांच्या समर्थकांचा मेळावा गुरुवारी मध्यरात्री मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला (Aurangabad) औरंगाबादेतून पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन जाण्याची जबाबदारी राजेंद्र जंजाळ यांच्यावर होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत जंजाळ यांची युवासेनेच्या (Yuvasena) उपसचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे युवासेना विस्तारक अविनाश खापे यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे बंडखोरांना साथ देणाऱ्याबाबत जराही दया माया दाखवायची नाही, असे कडक धोरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्वीकारल्याचे दिसते. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच शिक्षा देते, हा इतिहास आहे, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी युवासेनेच्या निष्ठा मेळाव्यात दिला होता.

ठाकरे कुटुंबातील सदस्यांनी सदैव जनतेला न्याय मानले आहे. अनेकदा खुद्द न्यायालयात जाहीर वाक्य सांगितले आहे. त्यामुळे आता गद्दार बंडखोरांना जनता न्यायालयात जावे लागेल. त्यामध्ये शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना जनताच शिक्षा देते, हा इतिहास आहे. हा निकाल लवकरच सर्वांसमोर येईल. यापूर्वी जनतेने बंडखोर खासदार, आमदारांसह मुख्यमंत्री यांना पराभूत केले आहे.

शिवसेनेचे ४० आमदार शिंदे सोबत गेले, त्यांनी निष्ठा विकून गद्दारी केली. त्यांना धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या. यासाठी युवासेनेने आपली ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन यांनी केले. राजेंद्र जंजाळ यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने शिंदे गटाला हा धक्का समजला जात आहे.

Shivsena Leader Chandrakant Khiare-Rajendra Janjal News
Latur : देशमुखांचा करेक्ट कार्यक्रम फसला, कारखाना ताब्यात घेत निलंगेकरांची बाजी..

जंजाळ हे महापालिकेत उपमहापौर राहिलेले आहेत. स्थायी समिती सदस्य आणि सभागृहनेता म्हणून त्यांनी काम केलेले आहे. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. पण शिंदे यांच्या बंडानंतर ते पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यासोबत राहिले. मुंबईहून मतदारंसघात परतल्यानंतर विमातळापासून काढण्यात आलेल्या वाहन रॅलीत देखील जंजाळ सर्वात पुढे होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com