Shivsena : नवनीत राणांचा उल्लेख `सिगारेट पिणारी बाई` असा करत खैरेंची टीका..

नवनीत राणा या चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आल्या आहेत. दक्षिणेत त्यांनी अनेक चित्रपटांतू भूमिका केलेल्या आहेत. नेमकं यावर बोट ठेवत चंद्रकांत खैरे यांनी टीका केली. (Chandrakant Khaire)
Chandrakant Khaire-Mp Navneet Rana News, Aurangabad
Chandrakant Khaire-Mp Navneet Rana News, AurangabadSarkarnama

औरंगाबाद : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत दिलेले आव्हान (Shivsena) शिवसेनेला चांगलेच झोंबले आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी नवनीत राणा यांचा `सिगारेट पिणारी बाई`, असा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नवीनत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना `तू उद्धव ठाकरे है, तू शिवसेनावाला है तो, मै भी राणा हू, विदर्भची सून आहे`, अशा शब्दात होऊन जाऊ द्या आमने-सामने असे जाहीर आव्हान जळगाव येथील कार्यक्रमात बोलतांना दिले होते.

यावर खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत नवनीत राणा (Navneet Rana) यांना सुनावले. खैरे म्हणाले, जी बाई चित्रपटात सिगारेट पिते, कसले तरी कपडे घालते, ती आम्हाला शहाणपणा आणि हनुमान चालीसा शिकवणार का? खैरे यांच्या या विधानानंतर राणा समर्थक विरुद्ध शिवसैनिक असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तातंर होऊन ठाकरे सरकार गेले त्यानंतर नवनीत राणा अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.

महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतांना राणा दाम्पत्यांनी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर ठाकरे सरकराने राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करत त्यांना तुरुगांत डांबले होते. तेव्हापासूनच राणा विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू आहे. आता राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेनेविरुद्ध दंड थोपटले आहे.

Chandrakant Khaire-Mp Navneet Rana News, Aurangabad
देवापेक्षा जास्त विश्वास शिंदे, फडणवीसांवर, मराठा समाजाला लवकरच आरक्षण..

जळगाव येथे सामुहिक हनुमान चालीसा पठाणाच्या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसेनेकडून सतंप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नवनीत राणा या चित्रपट क्षेत्रातून राजकारणात आल्या आहेत. दक्षिणेत त्यांनी अनेक चित्रपटांतू भूमिका केलेल्या आहेत. नेमकं यावर बोट ठेवत चित्रपटातील पात्रांचा व पेहरावाचा उल्लेख करत चंद्रकांत खैरे यांनी नवनीत राणा यांचा उल्लेख सिगारेट पिणारी बाई असा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in