Shivsena : `मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, पायी दिंडी जालना मतदारसंघात..

`मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, मोहिमेअंतर्गत जालन्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद पायी दिंडी यात्रा काढण्यात येत आहे. ( Shivsena Jalna)
Shivsena jalna News
Shivsena jalna NewsSarkarnama

जालना : उद्धवसेनेकडून गद्दारांच्या मतदारसंघात नव्याने संघटना बांधणीचे काम जोमाने हाती घेण्यात आले आहे. मराठवाड्यासह राज्यभरात उद्धवसेना सक्रीय झाली असून नेते, उपनेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यवधीसाठी तयार राहा, असे आवाहन केल्यानंतर तर या कामाला अधिकच गती आली आहे. जालना लोकसभा व विधानसभा मतदारसंघावर उद्धवसेनेने लक्ष देत भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Shivsena jalna News
NCP : आव्हाडांवरील गुन्ह्याबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय ; महिला लोकप्रतिनिधी आक्रमक

`मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी`, मोहिमेअंतर्गत जालन्यात (Shivsena) शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संवाद पायी दिंडी यात्रा काढण्यात येत आहे. (jalna) आज या दिंडीला सुरूवात करण्यात आली. येत्या काही दिवसांत ही शेतकरी संवाद पायी दिंडी यात्रा गावागावात पोहचणार आहे. राज्यातील सत्तांतर आणि शिवसेनेतील बंडानंतर जालन्यातून अर्जून खोतकर फुटले असले तरी सामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारी एकनिष्ठ राहिले.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच काम करणार असा निर्धार जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केल्यामुळे खोतकरांना अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही. दुसरीकडे रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील वाद मिटल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण केले जात असले किंवा त्यांच्यांकडून तास दावा केला जात असला, तरी त्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नाही. जालना लोकसभेची जागा भाजपकडे तर विधानसभेची शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला या दोन्ही पातळीवर दानवे-खोतकर जोडीशी दोन हात करावे लागणार आहेत.

जालना हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो यापुढेही कायम ठेवण्यासाठी उध्दवसेनेचे नेते कामाला लागले आहेत. मी शिवसेनेचा वारकरी, माझा विठ्ठल घरोघरी या माध्यमातून शिवसैनिक गावागावात शेतकरी संवाद पायी दिंडी पोहचवणार आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते लक्ष्मण वडले यांच्या उपस्थित या दिडींला आज प्रारंभ झाला. जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे आदीसह सर्व शिवसैनिक, युवसैनिक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in